राधाकृष्ण विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील sakal
अहमदनगर

Ahmednagar : तीर्थक्षेत्रांचा विकास करू ; विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा

अकोले : जिल्ह्याला मोठा आध्यात्मिक वारसा असल्याने, प्रत्येक तीर्थक्षेत्राचा विकास करून ते पर्यटनस्थळ करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील दत्तनगरमधील देवस्थानच्या रौप्यमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास मंत्री विखे पाटील यांनी भेट देऊन भाविकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पंचवीस वर्षांपासून सप्ताहाची परंपरा सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहमंत्री शंकर गायकर, बजरंग दलाचे विवेक कुलकर्णी, माजी आमदार वैभव पिचड, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, संगमनेर तालुकाध्यक्ष सतीश कानवडे, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ, गिरजाजी जाधव, राजाभाऊ देशमुख यांच्यासह भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक ॲड. अशोकराव गायकर यांनी केले. सूत्रसंचालन गणेश गायकर यांनी केले.

ब्राह्मणवाड्याला ऐतिहासिक वारसा

विखे पाटील म्हणाले, की ब्राह्मणवाडा गावाला ऐतिहासिक वारसा आहे. दत्तवाडीचे नामकरण हे अध्यात्मामुळे झाले. गावोगावी धार्मिक सोहळे होतात. गावोगावी ज्ञानोबा-तुकोबांचा गजर सुरू असल्यानेच गावाचे सांस्कृतिक वातावरण टिकून असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT