Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

केंद्र सरकारनं शनिवारी ९९,१५० टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याची सध्या चर्चा आहे.
Onion Export
Onion Exportesakal

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं आज देशातील ९९,१५० टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचं जाहीर केलं. पण केंद्राच्या या घोषणेवर शेतकरी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. कारण ही घोषणा जुनीच असल्याचं सांगत प्रत्यक्षात नव्यानं एक किलो कांद्याच्या निर्यातीलाही परवानगी दिलेली नाही. हा केवळ निवडणुकीचा जुमला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Is really permission for onion export by union govt what exactly happened need to know)

Onion Export
PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

केंद्रानं आज कांदा निर्यात बंदी उठवल्याची जी घोषणा केली आहे त्याची अधिसूचना विदेश व्यापार महासंचालनालयानं काढलेली नाही. यापूर्वीही कांदा निर्यातबंदी उठवल्याची अफवा पसरली होती. सध्या केंद्र सरकारनं ९९,१५० लाख टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्यानं कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं शनिवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटलं की, केंद्रानं ९९,१५० टन कांदा निर्यातीला परवागनी दिली. त्यानुसार, भारतातील कांदा बांगलादेश, युएई, भूतान, बहारिन, मॉरिशन आणि श्रीलंकेसाठी निर्यात होणार आहे. पण या देशांना नेमका किती कांदा निर्यात होणार याचा उल्लेख प्रसिद्धी पत्रकात केलेला नाही. तसेच या निर्यातीला नव्यानं परवानगी दिली हे देखील स्पष्ट केलेलं नाही. कारण यापूर्वीच केंद्र सरकारनं या देशांना विविध टप्प्यात कांदा निर्यातीची परवानगी दिलेली आहे. (Latest Marathi News)

Onion Export
Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

या प्रसिद्धीपत्रकात गुजरातचा २ हजार टन कांदा निर्यात करणं का गरजेचं आहे आणि सरकार ५ लाख टन कांद्याची खरेदी करुन शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार आहे, हेच सांगितलं आहे. पण नव्यानं एक किलो कांद्यालाही निर्यातीसाठी परवानगी दिल्याचा यामध्ये उल्लेख नाही. त्यामुळं सध्या ज्या ९९,१५० टन कांदा निर्यातीची चर्चा सुरु आहे, ती निर्यात यापूर्वीच झालेली आहे. त्यामुळं हा केवळ निवडणुकीच्या काळातील जुमला असल्याचं स्पष्ट होत आहे. (Marathi Tajya Batmya)

Onion Export
Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

केंद्राच्या या घोषणेबाबत शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव सांगतात, कांदा निर्यातीला नव्यानं परवानगी मिळालेली नाही, ही परवानगी जुनीच आहे. आधीच निर्यात झालेल्या कांद्याची माहिती केवळ यातून देण्यात आलेली आहे. भारतातील निर्यातबंदीमुळं चीन, पाकिस्तान आणि इजिप्तमधील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. (Latest Marathi News)

Onion Export
Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केंद्रावर आरोप करताना म्हटलं की, सरकारनं प्रसिद्धीपत्रक काढून ९९,१५० टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचं म्हटलं आहे ती केवळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात केलेली धुळफेक आहे. निवडणुकीच्या काळातही सरकार शेतकऱ्यांना गांभीर्यानं घ्यायला तयार नाही. जर सरकारला खरंच शेतकऱ्यांची चिंता असेल तर सरसकट कांदा निर्यातबंदी उठवावी, अशी मागणीही तुपकर यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com