अहमदनगर

साईनगरीतील श्रीरामनवमी उत्सवाला शतकी परंपरा! साईबाबांच्या उपस्थितीत द्वारकामाईत ११३ वर्षांपूर्वी पहिला उत्सव झाला साजरा

सकाळ डिजिटल टीम

Shirdi Ram Navmi Utsav 113 Years ago: श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या प्रेरणेतून ते वास्तव्यास असलेल्या द्वारकामाईत एकशे तेरा वर्षांपूर्वी पहिला श्रीरामनवमी उत्सव साजरा झाला.

एवढेच नाही, तर संतकवी दासगणू यांच्या परंपरेतील नारदीय कीर्तनाची परंपरा या उत्सवाच्या निमित्ताने रूढ झाली. विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांचे स्नेही दादासाहेब खापर्डे यांच्यासह तत्कालीन साईभक्तांचा हा उत्सव सुरू करण्यात सहभाग होता. साईभक्तांनी येथील श्रीरामनवी उत्सवाची कीर्ती देश-विदेशात पोहोचवली.

साईभक्त बाबांना प्रभू रामचंद्राच्या रूपात पाहतात. त्यांचा उल्लेख साईराम असा करतात. विविध राज्यांतून शेकडो पदयात्री भाविकांसह साईरामाचा गजर करीत येथे येणाऱ्या पालख्या हे बाबांच्या श्रीरामनवमी उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट आहे. प्रभू रामचंद्राचे आणि साईंचे हे असे अतूट नाते आहे.(Latest Marathi News)

बाबांच्या हयातीत लोकमान्यांचे स्नेही दादासाहेब खापर्डे हे शिर्डीत सहकुटुंब मुक्कामाला होते. श्रीरामनवमी तोंडावर आली होती. कीर्तनकार कृष्णराव भीष्म, साईभक्त काका महाजनी यांनी साईबाबांसमोर श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्याची कल्पना मांडली. बाबांनी होकार दिला.

७ एप्रिल १९११ रोजी बाबा वास्तव्यास असलेल्या द्वारकामाईत पहिला श्रीरामजन्मोत्सव पार पडला. भीष्मांनी कीर्तन सादर केले. १९१४ सालापासून संतकवी दासगणू महाराजांनी बाबांच्या आज्ञेवरून पहिले नारदीय कीर्तन सादर केले. पुढे हयातभर त्यांनी श्रीरामजन्मावर आधारित नारदीय कीर्तन सादर करण्याची परंपरा सुरू ठेवली. बाबांच्या हयातीत सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. येथील प्रत्येक उत्सवात नारदीय कीर्तन सादर केले जाते. (Latest Marathi News)

बाबांनी सुरू केलेल्या येथील श्रीरामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी विविध राज्यांतून शेकडो भाविक साईंच्या शिर्डीत साईरामाचा गजर करीत पालख्या घेऊन येथे येतात. एका अर्थाने हा पालख्यांचा उत्सव झाला आहे. बाबांनी सुरू केलेला हा उत्सव आता साईभक्तांच्या वतीने शंभराहून अधिक देशांत साजरा होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT