Mira Road Incident: मीरा रोड परिसरात रात्री दोन गटात वाद! पाच जणांना अटक

सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
Crime News
Crime Newsesakal

मुंबईतल्या मीरा रोड परिसरात रविवारी रात्री दोन गटात राडा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारात हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही केली आहे. (Mumabai Mira Road Incident dispute between two groups at night Five people were arrested)

Crime News
Ayodhya Pran Pratishtha: कैतरिना कैफ, सचिन तेंडुलकर ते अमिताभ बच्चन; प्राण प्रतिष्ठेसाठी 'या' सेलिब्रेटी अयोध्येकडं रवाना

पोलीस उपायुक्त जयंत बजबाळे यांनी सांगितलं की, "काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईजवळील मीरा रोड परिसरातील नया नगर भागात एका गटाकडून तीन-चार वाहनांमधून घोषणाबाजी सुरु केली. यामुळं दुसऱ्या गटासोबत त्यांचा वाद झाला. यानंतर परिसरात दगडफेक आणि गाड्यांच्या तोडफोडीची घटना देखील घडली. (Latest Marathi News)

पाच जणांना अटक

दरम्यान, परिस्थिती बिघडत चालली असल्याचं लक्षात येताच पोलिसांची गाडी घटनास्थळी तातडीनं दाखल झाली आणि काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी या भागात फ्लॅगमार्चही केला. याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून तपासही सुरु करण्यात आला आहे. (Marathi Tajya Batmya)

Crime News
Ashish Shelar on Uddhav Thackeray: आज जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा...; आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल

सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नये

या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती देताना नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास सुपे यांनी सांगितलं की, "२१ जानेवारी रोजी साडेदहा वाजता सुमारास किरकोळ कारणावरुन दोन गटांत वाद झाला होता.

सध्या ठिकाणी तणाव निवळला असून सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच त्यामुळं संभ्रम निर्माण करून घेऊ नये. सोशल मीडियावर येणारे मेसेज खात्री केल्याशिवाय कोणीही फॉरवर्ड करू नये. सर्वांनी शांतता राखून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com