Alternatives to petrol Will allow ethanol pumps Nitin Gadkari akole ahmednagar sakal
अहिल्यानगर

इथेनॉल पंपांची परवानगी देणार - नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री गडकरी यांचे प्रतिपादन, कारखानदारांनी पेट्रोल हद्दपारीचा संकल्प करा

सकाळ वृत्तसेवा

अकोले : ‘पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे आलेल्या इथेनॉलला चालना देण्याची गरज आहे. नगर जिल्ह्यात ऊस आणि साखर कारखाने भरपूर आहेत. येथील नेत्यांनी ठरविले तर आम्ही कारखान्यांना इथेनॉल पंपांची परवानगी देऊ. शंभर टक्के इथेनॉलवर वाहने चालविण्याची परवानगीही मिळत आहे. त्यामुळे यापुढे इंधनासाठी बाहेर जाणारा पैसा आता शेतकऱ्यांच्या घरात आला पाहिजे. या जिल्ह्यातून पेट्रोल हद्दपार करण्याचा संकल्प करून युवा नेत्यांनी पुढाकार घ्यावा. शेतकरी राजा केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता व्हावा, असा आशावाद केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

अकोले येथे भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गडकरी अकोल्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, की नगर जिल्हा ऊस आणि साखरेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता पारंपरिक पद्धतीने केवळ उसापासून साखर निर्माण करण्याचे दिवस गेले. आता पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे आलेल्या इथेनॉलची निर्मिती आणि विक्री केली पाहिजे. दरवर्षी आपल्याला दहा लाख कोटी रुपये इंधनासाठी खर्च करावे लागतात. यातील बराचसा पैसा बाहेर जातो. हा पैसा शेतकऱ्यांच्या घरात कसा जाईल, याचा विचार केला पाहिजे.

उसापासून थेट इथेनॉल निर्मिती आता शक्य आहे. शिवाय इथेनॉल आणि पेट्रोल दोघांची ऊर्जा क्षमता सारखीच असल्याचेही आढळून आले आहे. तुलनेत स्वस्त असलेले इथेनॉल वाहनचालकांना परवडेल. परिणामी पेट्रोलसाठी बाहेर जाणारा पैसा ऊसउत्पादकांच्या घरात जाईल. यापुढे शेतकरी केवळ अन्नदाता नव्हे, तर ऊर्जादाता झाला पाहिजे. याची सुरवात तुमच्या नगर जिल्ह्यापासून करा. या जिल्ह्यातून पेट्रोल हद्दपार करा. यासाठी हवी ती मदत करायला आम्ही तयार आहोत. साखर कारखाने आणि राजकारणात आलेल्या नव्या पिढीने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

जे बोलतो, ते करून दाखवतो

यावेळी गडकरी यांनी इंधन आणि वाहनांच्या क्षेत्रातील अनेक नवनवीन संकल्पना सांगितल्या. ते म्हणाले, की तुम्ही म्हणाल हे नुसतेच बोलतात. मंत्री असेच असतात. मात्र, इतरांसारखे माझे नाही. आला आणि बोलून गेला, असे माझे नाही. जे होणार आहे, तेच मी बोलतो आणि जे बोलतो, ते करून दाखवितो, असेही गडकरी म्हणाले. आदिवासी भागातील कच्च्या मालापासून नवी उत्पादने करून आदिवासींचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup 2026 Squad Announce : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलचा पत्ता कट, उप कर्णधार बदलला; इशान किशनही परतला

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला काय करावं अन् काय करू नये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Bangladesh violence : बांगलादेशमध्ये काहीतरी मोठं घडणार? भारताची चिंता वाढली; अमेरिकेनं नागरिकांना दिल्या अलर्ट राहण्याच्या सूचना

Shivaji University Protest Violence : ब्रेकिंग! शिवाजी विद्यापीठात एबीव्हीपीच्या आंदोलनाला हिंसक वळण; पोलिस-विद्यार्थींमध्ये झटापट, घटनेचा व्हिडिओ व्हायरल...

Honor Killing Case : 40 वर्षाच्या तरुणाचं 19 वर्षाच्या तरुणीवर प्रेम; मुलीच्या घरात कळताच बापानं गाडीतच गळा चिरून केली प्रियकराची हत्या

SCROLL FOR NEXT