Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Aditya Thackeray Questions BJP: ...पण प्रत्येक अपयशाचा इव्हेन्ट कसा करायचा, हे ह्या भाजपकडून शिकायचे, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
Aditya Thackeray addressing media while criticizing the Mumbai Mayor and questioning BJP over the Bangladeshi infiltrators issue in Mumbai.

Aditya Thackeray addressing media while criticizing the Mumbai Mayor and questioning BJP over the Bangladeshi infiltrators issue in Mumbai.

esakal

Updated on

Aditya Thackeray on Bangladeshi Infiltrators Issue : मुंबईच्या भाजपच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. दरम्यान त्यांनी मुंबईमधील बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावले जाईल, असे म्हटले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांना टोला लगावत, भाजपला प्रश्न केले आहेत.

आदित्य़ ठाकरे यांनी एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘’नवनिर्वाचित महापौरांना आता एकच प्रश्न सतावतोय बांगलादेशी घुसखोरांचा! चांगलं आहे पण मुंबईतील नागरी प्रश्नांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होतेय; खोदून ठेवलेले रस्ते, न उचलला जाणारा कचरा, पादचारी मार्गांची दुरवस्था, मोकळ्या जागांवरील बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण, प्रदूषित पाणी आणि हवा…’’

तसेच ‘’बरं, पण हा विषय केंद्र आणि राज्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. कदाचित महापौरांना वाटत असेल ही खाती आपल्याकडेच आहेत!’’ असा टोलाही आदित्य ठाकरेंनी महापौरांना लगावला आहे.

Aditya Thackeray addressing media while criticizing the Mumbai Mayor and questioning BJP over the Bangladeshi infiltrators issue in Mumbai.
DGCA Action on Air India : 'एअर इंडिया'ला मोठा झटका!, 'डीजीसीए'ने ठोठावला १ कोटी रुपयांचा दंड

याशिवाय आदित्य ठाकरेंनी ‘’ भाजपने ह्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत..’’ असे म्हणत ‘’जर हे खरे असेल, तर बांगलादेशी भारतात बेकायदेशीरपणे कसे घुसले?, ते भारताच्या एका टोकापासून भाजपशासित राज्यांतून मजलदरमजल करीत मुंबईत कसे काय येऊ शकले?, इतकी वर्षे ते इथे कसे काय राहिले? केंद्रात तर दशकभरापासून भाजपचे सरकार आहे!’’  तसेच, ह्या राष्ट्रीय सुरक्षेतील अपयशासाठी जबाबदार कोण? गुप्तचर यंत्रणेचे अपयश? की प्रशासकीय अपयश? उत्तर एकच, भाजप! ‘’ अशी प्रश्नांची सरबत्ती करत टीका केली आहे.

Aditya Thackeray addressing media while criticizing the Mumbai Mayor and questioning BJP over the Bangladeshi infiltrators issue in Mumbai.
Betel Leaf : पान खाल्ल्याने ‘शुगर लेव्हल’ वाढते का? जाणून घ्या, तज्ञांचे मत!

याचबरोबर ‘’जे प्रत्येक निवडणुकीत सांगतात कि ते POK घेणार, ते आता बांगलादेशी घुसले कसे? ह्याचे उत्तर देऊ शकत नाही. पण प्रत्येक अपयशाचा इव्हेन्ट कसा करायचा, हे ह्या भाजपकडून शिकायचे!’’ असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

 तर ‘’जर मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर शिरले असतील, तर त्यांना रोखण्यात, ओळखण्यात आणि देशाबाहेर पाठवण्यात अपयश आले; हे केंद्र व राज्य सरकारने का लपवले? ह्यातून एकच सिद्ध होते की राष्ट्रीय सुरक्षेबाबत केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे!’’ अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com