dr. Asha Kadam
dr. Asha Kadam  sakal
अहमदनगर

अहमदनगर : आशा कदम यांच्या आयुर्वेदिक गर्भनिरोधक औषधाच्या संशोधनाला पेटंट

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : येथील वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. डॉ. आशा कदम-चव्हाण यांनी शोधलेल्या आयुर्वेदिक गर्भनिरोधक औषधाच्या फार्म्युल्यास (हर्बल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फार्म्युला) पेटंट मिळाले आहे. जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. आशा कदम-चव्हाण यांनी तब्बल १० वर्षे सखोल संशोधन आणि प्रयोग करून हे आयुर्वेदिक गर्भनिरोधक औषध शोधून काढले आहे. या संशोधनात त्यांना अहमदनगर महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बी. एम. गायकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या फार्म्युल्याचा उपयोग करून लवकरच नामांकित औषधनिर्माता कंपनीच्या मदतीने हे आयुर्वेदिक औषध टॅबलेट किंवा लिक्विड स्वरूपात बाजारात आणण्याचा त्यांचा मानस आहे. कदम म्हणाल्या, की वनस्पतिशास्त्र विषयाचा अभ्यास करीत असताना मला माझ्या शिक्षकांकडून संशोधनाची प्रेरणा मिळाली. बहुतेक गर्भनिरोधक औषधांचे स्त्रियांच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. मात्र, ग्रामीण भागात विशेषत: दुर्गम आदिवासी भागात जिथे साधा दवाखाना किंवा मेडिकलचे दुकान नाही, त्या ठिकाणी राहणाऱ्या महिला गर्भधारणा टाळण्यासाठी काय उपाय करीत असतील, याचा अभ्यास केला.

अकोले, भंडारदरा या भागात वारंवार जाऊन, तेथील महिलांना भेटून त्या करीत असलेल्या उपायांची, तसेच त्या खात असलेल्या झाडपाल्याची, बिया आणि साली यांविषयी माहिती घेऊन सखोल संशोधन केले. या महिला औषधी झाडांची पाने, साली, बिया खात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपण औषध शोधून काढले आहे. पुणे येथील राष्ट्रीय विष विज्ञान केंद्रातून हा फार्म्युला तपासून घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Firecracker Factory Blast: शिवकाशीतल्या फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू

Bajrang Punia: बजरंग पुनिया निलंबन प्रकरणाला नवं वळण; भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून परदेशात ट्रेनिंगसाठी निधी मंजूर, मात्र...

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी सांताक्रूझ आणि गोरेगावमध्ये वाहतूक बदल

Moon Express: चंद्राबाबत मोठी बातमी! मून एक्स्प्रेसची तयारी सुरू, नासा चालवणार ट्रेन

PBKS vs RCB Live Score : आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ लावणार जोर

SCROLL FOR NEXT