brutal murder of a waiter sleeping in a hotel in rahuri
brutal murder of a waiter sleeping in a hotel in rahuri Sakal
अहमदनगर

राहुरी : हॉटेलमध्ये झोपलेल्या वेटरचा निर्घृण खून

विलास कुलकर्णी

राहुरी (जि. अहमदनगर) : राहुरी येथे आज (रविवारी) सकाळी नगर-मनमाड महामार्गालगत एका हॉटेलमध्ये झोपलेल्या एका तरुण वेटरचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यात लोखंडी टॉमीचे प्रहार केल्याने डोक्याचा चेंदामेंदा करून, निर्घृण खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याबरोबर काल (शनिवारी) रात्री झोपलेला एक वेटर फरार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

सोनू नामदेव छत्री (वय २७, मुळचा नेपाळी, आधार कार्ड पत्ता रा. गेवराई, जि. बीड) असे मृताचे नाव आहे. तर, नामदेव केशव दराडे (वय ३०, रा. बोधेगाव, ता. शेवगांव) असे फरार वेटरचे नांव आहे. राहुरी ते राहुरी महाविद्यालय दरम्यान नगर-मनमाड महामार्गालगत हॉटेल 'साक्षी' मध्ये चार जण वेटर आहेत. पैकी दोन वेटर रात्री हॉटेलमध्ये झोपतात. आज (रविवारी) एकाचा मृतदेह आढळल्याची माहिती समजताच अप्पर पोलिस अधिक्षक डाॅ. दिपाली काळे, संदीप मिटके, पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, मधुकर शिंदे, निरज बोकिल, तुषार धाकराव यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

नगरचे ठसेतज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मदने व त्यांचे पथक, 'रक्षक' नावाच्या श्वानासह पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान जागेवरच घुटमळले. काल (शनिवारी) मध्यरात्री दीड ते पावणेदोन दरम्यान सोनूचा खून झाल्याची सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांची खात्री झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मृत सोनू छत्री मुळचा नेपाळ येथील रहिवाशी आहे. तो काही वर्षांपासून हाॅटेल साक्षी येथे वेटर म्हणून काम करत होता. पोलिस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. फरार वेटर नामदेव दराडे काही दिवसांपूर्वीच हाॅटेलमध्ये कामाला आला होता. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

फरार वेटर नामदेव दराडे याने खून केल्याचा प्राथमिक संशय आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. त्यांना सायबर क्राईमचे पथक मदत करीत आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यावर खुनाचे कारण स्पष्ट होईल. - संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक, श्रीरामपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT