Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

Hassan Sex Scandal: पीडित महिला रेवण्णा कुटुंबाची नातेवाईक आहे आणि ती त्यांच्यासाठी स्वयंपाकी म्हणून काम करत होती. तिने आरोप केला आहे की, पिता-पुत्राने सतत चार वर्षे आपले लैंगिक शोषण केले.
Hassan Sex Scandal|Prajwal Revanna
Hassan Sex Scandal|Prajwal RevannaEsakal

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि हसनचा खासदार प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कँडलचे वृत्त समोर आल्यानंतर कर्नाटकात मोठा वाद निर्माण झाला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी यांच्या पत्रानंतर कर्नाटक सरकारने रविवारी या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.

दरम्यान, पीडित महिला रेवण्णा कुटुंबाची नातेवाईक आहे आणि ती त्यांच्यासाठी स्वयंपाकी म्हणून काम करत होती. तिने आरोप केला आहे की, पिता-पुत्राने सतत चार वर्षे आपले लैंगिक शोषण केले, असे पीडितेने आपल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

पीडितेने एचडी रेवन्ना आणि त्यांचा खासदार मुलगा प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होलेनरसीपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना होलेनरसीपूरमधून आमदार आहे, तर एचडी रेवन्ना यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना हसन मतदारसंघातून खासदार आहे.

पीडित महिला एचडी रेवण्णा यांची पत्नी भवानी यांची नातेवाईक आहे. तिने तक्रारीत म्हटले आहे की, 2019 मध्ये रेवन्नाचा मुलगा सूरजच्या लग्नात तिला कामावर बोलावण्यात आले होते. लग्नानंतरही ती तेथेच काम करत होती.

प्रज्वल रेवन्ना हा तिला वारंवार खोलीत बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे, असे पीडितेने म्हटले आहे.

Hassan Sex Scandal|Prajwal Revanna
Ravindra Waikar: ईडी कारवाई, शिंदे गटात प्रवेश अन् आता लोकसभा उमेदवारी... जाणून घ्या कोण आहेत रवींद्र वायकर

रेवण्णा यांच्या घरात सहा महिला काम करायच्या. प्रज्वल रेवण्णा घरात आल्यावर सगळ्या बायका घाबरायच्या. तो सर्वांना खोलीत बोलावून त्यांचा विनयभंग करत असे. घरात काम करणाऱ्या पुरुषांनी त्यांना प्रज्ज्वलबाबत सावध केले होते, असा आरोप पीडितेने केला आहे.

एफआयआरनुसार, पीडितेने सांगितले की, महिला स्वयंपाकघरात काम करत असताना प्रज्वल मागून येऊन त्यांना पकडून मिठी मारत असे.

Hassan Sex Scandal|Prajwal Revanna
खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

पीडितेने सांगितले की, एचडी रेवन्ना पत्नी घराबाहेर पडताच हुरळून जायचा. तो तिच्यासह घरात काम करणाऱ्या महिलांना स्टोअर रूममध्ये बोलावत असे. फळ देण्याच्या बहाण्याने ते इकडे तिकडे हात लावायचा. साडीच्या पिन काढून लैंगिक अत्याचार करायचा.

पीडितेने सांगितले की, नुकतेच लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती घाबरली होती. तिचा नवराही तिच्यावर संशय घेऊ लागला. त्यानंतरच तिने एफआयआर नोंदवण्याचे धाडस दाखवले.

दरम्यान, एका पेन ड्राईव्हमध्ये लैंगिक शोषणाचे जवळपास तीन हजार व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती प्रज्वल रेवन्ना असल्याचे सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com