The Collector of the town, Dr. Rajendra Bhosale
The Collector of the town, Dr. Rajendra Bhosale 
अहमदनगर

पालक गमावलेल्या मुलांना योजनांचा लाभ द्या : जिल्हाधिकारी डॉ. भोसले

सकाऴ वृत्तसेवा

कोरोनाने पालकांचे छत्र हरवलेल्या मुलांना सामाजिक आधार देण्याचे काम राज्य शासनाच्या निर्णयानुसार करण्यात येणार आहे.

अहमदनगर : कोरोनामुळे (Corona) अनेक मुलांच्या पालकांचा मृत्यू (Died) झाला आहे. काही मुलांनी तर आई-वडील दोघांनाही गमावले आहे. अशा निराधार मुला-मुलींची अगदी गावपातळीपासूनची माहिती संकलित करून जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे सादर करून त्यांना योजनांचा (scheme) लाभ द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (collector dr. rajendra bhosale) यांनी दिले आहेत.(collector dr. rajendra bhosale said the scheme should benefit children whose parents have died due to corona)

कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तर कृतिदलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.जी.पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक आर.एल.मोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, बालहक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, समिती सदस्य ॲड. बागेश्री जरंडेकर, प्रवीण मुत्याळ, पोलीस निरीक्षक मसूद खान, चाईल्डलाईनचे प्रतिनिधी महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेली एकूण आठ मुले आहेत. एक पालक गमावलेली १२६ एकूण बालके सापडली आहेत. मात्र, कोरोनाने पालकांचे छत्र हरवलेल्या मुलांना सामाजिक आधार देण्याचे काम राज्य शासनाच्या निर्णयानुसार करण्यात येणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची देखभाल करणारे नातेवाईकांचीही माहिती संकलित करून या मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची माहिती घेऊन त्याची नोंद तपासणी अहवालात घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्या. (collector dr. rajendra bhosale said the scheme should benefit children whose parents have died due to corona)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

SCROLL FOR NEXT