crime update ahmednagar Punish three beat the customer
crime update ahmednagar Punish three beat the customer Sakal
अहमदनगर

ग्राहकाला मारहाण करणाऱ्या तिघांना शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : दोन ग्राहकांना मारहाण केल्याप्रकरणी दुकानदार किशोर संजय भागानगरे (वय 33), अक्षय संजय भागानगरे (वय 28), संजय दत्तात्रय भागानगरे (वय 56, सर्व रा. कुंभारगल्ली, नालेगाव) या तिघांना तीन वर्ष सक्‍तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. कुर्तडीकर यांनी ठोठावली. अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

अतुल सुभाष वाघचौरे व त्यांचा मित्र धीरज भगवान रोहोकले हे दोघे ता. 8 सप्टेंबर 2017 रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास शहरातील चौपाटी कारंजा येथे सिध्देश्वर उडपी सेंटर या गाडीवर स्पंज डोसा खाण्याकरीता गेले होते. त्यांनी अक्षय भागानगरे याला दोन स्पंज डोसे मागितले असता, त्याने त्यांना स्पंज डोसे दिले. अतुल व त्याचा मित्र तो डोसा खात असताना त्यांना असे जाणवले की, बटाट्याची चटणी विटली असून त्यामुळे डोसा खराब लागत आहे. त्यामुळे अतुलने अक्षयला म्हटले, डोशातील चटणी खराब झाली असून तिचा वास येत आहे. त्यामुळे डोसा खाण्यास खराब लागत आहे.

या वादातून किशोर भागानगरे याने हातातील लोखंडी कवचा घेऊन अतुलच्या डोक्‍यात मारला. संजय भागानगरे याने लाकडी दांडक्‍याने अतुलच्या पाठीत मारहाण केली. तसेच अक्षय याने त्याच्या नाष्टा सेंटरच्या गाडीमध्ये ठेवलेली तलवार काढली व धीरजच्या डोक्‍यावर तलवारीचा वार केले. अतुलच्या जबाबावरून तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. मूळ फिर्यादीतर्फे ऍड. सुहास टोणे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी पोलिस अंमलदार एम. ए. थोरात यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT