पत्नी, मुलाची हत्या केल्यानंतर मेहुण्याला व्हिडिओ कॉल; पतीला अटक
पत्नी, मुलाची हत्या केल्यानंतर मेहुण्याला व्हिडिओ कॉल; पतीला अटक sakal
अहमदनगर

पत्नी, मुलाची हत्या केल्यानंतर मेहुण्याला व्हिडिओ कॉल; पतीला अटक

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : तालुक्यातील निमगाव खैरी शिवारात पतीने पत्नीचा खून करून मुलाला शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास दिल्याची घटना काल (ता. १०) घडली. याप्रकरणातील आरोपी बलराम दत्तात्रय कुदळे याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पत्नी अक्षदा व मुलगा शिवतेज यांचा खून केल्यानंतर आरोपीने चाकण येथील मेव्हुणा महेश बोरावके याला व्हिडिओ कॉल करून घटनेची माहिती व मृत्यूमुखी पडलेल्या पत्नी व मुलाचे मृतदेह दाखविले. तसेच त्यांचे फोटो काढून नातेवाईकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर ही टाकले.

घटनेनंतर तो पोलिसात हजर झाला. घडलेला घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अक्षदा हिने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याचाच राग बालरामच्या डोक्यात अनेक दिवसांपासून होता. यातूनच हे हत्याकांड घडल्याचा संशय तालुका पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी व्यक्त केला आहे. तसेच बलराम हा लहानपणापासून जास्त बोलका नव्हता, तो फारसे कोणाशी बोलत नासायचा असे त्याच्या शालेय मित्राकडून समजले.

रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच गोंधवणी येथील जीवन कुदळे यांचे घर जाळल्या प्रकरणी कोणीही तक्रार आद्यप दिलेली नसल्याने गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही. संबंधितांना तक्रार देण्याबाबत कळविले असल्याचे शहर पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT