Decision to close Parner Market Committee
Decision to close Parner Market Committee esakal
अहमदनगर

पारनेर बाजार समितीतील हमाल, दिवाणजी कोरोना बाधित

सकाळ डिजिटल टीम

पारनेर ः पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आठ हमालांना, तसेच काही दिवाणजींना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीतर्फे घेण्यात आला आहे.

सध्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा घेऊन येत आहेत. त्यातच बाजार समितीतील आठ हमाल व काही दिवाणजींना करोनाची लागण झाली आहे. सुरक्षा उपाययोजना केल्या, तरीही कोरोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी बाजार समिती 30 एप्रिल पर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. सध्या अवकाळी पाऊस होत असल्याने व साठवण्याची सोय नसल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन येत आहेत.

हमालांना एकत्रीत काम करावे लागते. तसेच लिलाव करतानाही शेतकरी, व्यापारी, दिवाणजी यांचा सततचा संबंध येतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी लिलाव बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याने, हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून 30 एप्रिलपर्यंत लिलाव बंद ठेवण्यात येतील, असे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.

सोळा हजार गोण्यांची आवक

आज बाजार समितीत 15 हजार 945 कांदा गोण्यांची आवक झाली. प्रथम क्रमांकाच्या कांद्याला एक हजार ते एक हजार दोनशे रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या कांद्यास सातशे ते नऊशे रुपये व गोल्टीला दोनशे ते सहाशे रुपये दर मिळाला.

बातमीदार - मार्तंड बुचुडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT