hivarebajar road
hivarebajar road 
अहमदनगर

लॉकडाउन असतानाही आदर्शगाव हिवरेबाजारच्या रस्त्यांची लागली "वाट' 

सकाळ वृत्तसेवा

नगर : देशात सर्वत्र गेली महिन्याभरापासून लॉकडाउन आहे. त्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलिस प्रशासनाने नाकेबंदी केली आहे. अशा परिस्थितीत अवजड वस्तू व नागरिकांच्या वाहतुकीसाठी राज्यमार्ग सोडून जिल्हा रस्ते, गाव अंतर्गत रस्ते, पानंद रस्त्यांचा वापर करून काही जण चोरट्या पद्धतीने वाहतूक करत आहे. पोलिस प्रशासनातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचा हे अवजड वाहतूक करणारे नागरिक गैरफायदा घेत लॉकडाउनमधील नियमांना पायदळी तुडवित आहेत. 

ही अवजड वाहतूक अडमार्गांत असलेल्या गावांतून होऊ लागल्याने या गावांतील रस्ते खराब होत आहेत. ही अवजड वाहने गावातून जाण्यामुळे तेथील नागरिकांना नवीन नागरी प्रश्‍नांना तोंड द्यावे लागत आहे. असा प्रकार सध्या आदर्शगाव असलेल्या हिवरेबाजारच्या बाबतीत समोर आला आहे. 

देशात लॉकडाउन असल्याने भाळवणी- पारनेर व विळद बाह्यवळण रस्ते बंद आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील अवजड वाहतूक हिवरेबाजारमधून होऊ लागली आहे. या वाहतुकीमुळे हिवरेबाजारमध्ये नागरी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ही अवजड वाहतूक त्वरित थांबवावी, अशी विनंती हिवरेबाजार ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. 

गेली 30 वर्षे हिवरेबाजार ग्रामस्थांनी लोकसहभागातून आदर्श गाव हिवरे बाजार उभे केले. येथील रस्ते 10 ते 12 वर्षे होऊनही सुस्थितीत आहेत. सध्या लॉकडाउनमुळे भाळवणी- पारनेर व विळद बाह्यवळण रस्त्यांवर नाकेबंदी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक हिवरेबाजारमार्गे होत आहे. त्यामुळे हिवरेबाजारचे रस्ते लवकर खराब होण्याची भीती आहे. हिवरेबाजार गावठाणाअंतर्गत सर्वत्र फूटपाथ केले असून, फूटपाथवरून अवजड वाहने गेल्यास पेव्हर ब्लॉक तुटतात. तसेच, रस्त्यावरच्या उंच वाहनांच्या वाहतुकीमुळे तीन ते चार वेळा विद्युत तारा तुटल्या होत्या. जड वाहतूक सुरू राहिल्यास चार महिन्यांत संपूर्ण रस्ते खराब होतील. रस्तेदुरुस्तीसाठी अंदाजे चार ते पाच कोटी खर्च येईल. मात्र, निधीअभावी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करता येणार नाहीत. त्यामुळे अवजड वाहतूकदारांनी हिवरेबाजारमधून अवजड वाहतूक करू नये, अशी विनंती केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT