The election results of 48 gram panchayats of Shevgaon taluka have been declared.jpg
The election results of 48 gram panchayats of Shevgaon taluka have been declared.jpg 
अहमदनगर

Gram Panchayat Results : शेवगाव तालुक्यात प्रस्थापितांना धक्का; नवख्या उमेदवारांची बाजी

सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले असून अनेक वर्षापासून सत्तेत असलेल्या मातब्बर व प्रस्थापित उमेदवारांना नवख्या तरुण उमेदवारांनी पराभूत केले आहे. भातकुडगाव, घोटण, चापडगाव, आखतवाडे, ठाकुर निमगाव, पिंगेवाडी, निंबेनांदुर येथे सत्तांतर झाले. तर पिंगेवाडी येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे तर आखातवाडे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे यांच्या मंडळाचा सर्व जागेवर दारुण पराभव झाला आहे. निवडणुकीतील पक्षीय बलाबल अधिकृत जाहीर झाले नसले तरी बहुतांशी गावात राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. मतमोजणीनंतर विजयी उमदेवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाच्या असलेल्या भातकुडगाव ग्रामपंचायतीत विठ्ठल फटांगरे यांच्या नेतृत्वाखालील माऊली परिवर्तन मंडळाने १० जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. तर विरोधी राजेश फटांगरे यांच्या ज्ञानेश्वर मंडळास तीन जागेवर समाधान मानावे लागले. चापडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भरत लोहकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या जगदंबा मंडळाने नऊ जागेवर विजय मिळवत सत्तांतर केले. येथे बाळासाहेब मुंदडा, पंडीत नेमाणे व संतराम गायकवाड यांच्या रेणुकामाता मंडळास अवघ्या दोन जागा मिळाल्या. 

येथे प्रभाग दोनमधील उमेदवारास समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली. त्यात जगदंबा मंडळाचे शहादेव पातकळ निवडून आले. घोटण येथे लक्ष्मण टाकळकर, अशोक मोटकर, संजय टाकळकर यांच्या मल्लिकार्जुनेश्वर महाविकास आघाडीस आठ जागा मिळाल्या तर अरुण घाडगे, रणजीत घुगे, कुंडलीक घुगे यांच्या मल्लिकार्जुनेश्वर शेतकरी मंडळास पाच जागा मिळाल्या. हातगाव येथे राजेंद्र भराट, शिवाजी भराट यांच्या नम्रता ग्रामविकास मंडळास सात तर किसन अभंग, भाऊसाहेब मुरकुटे यांच्या हत्तेश्वर ग्रामविकास मंडळास सहा जागा मिळाल्या.
 
पिंगेवाडी येथे नंदकुमार मुंढे व अशोक तानवडे यांच्या ज्ञानेश्वर भगवान बाबा मंडळाने सर्वच्या सर्व नऊ जागेवर विजय मिळवला. येथे सत्तेवर असलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या मंडळाचा दारुण पराभव झाला. आखातवाडे येथे रघुवीर उगले यांच्या भैरवनाथ परिवर्तन मंडळाने सर्व नऊ जागेवर विजय मिळवत सत्ता परिवर्तन केले. तेथे माजी जिल्हा परीषद सदस्य बाळासाहेब सोनवणे यांच्या मंडळाचा पराभव झाला. ठाकुर निमगाव येथे संभाजी कातकडे व लक्ष्मण मडके यांच्या परिवर्तन मंडळास सहा तर बाजार समितीचे माजी सभापती गहिनिनाथ कातकडे यांच्या मंडळास तीन जागा मिळाल्या. 

निंबेनांदुर येथे राजाजी बुधवंत व भाऊसाहेब चेके यांच्या ज्ञानेश्वर मंडळास पाच तर कैलास बुधवंत यांच्या शनैश्वर मंडळास चार जागा मिळाल्या. ढोरजळगाव शे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये डाँ. सुधाकर लांडे, राजेंद्र देशमुख यांच्या ज्ञानेश्वर ग्रामविकास मंडळास नऊ तर बापुसाहेब पाटेकर, महादेव पाटेकर, काकासाहेब पाटेकर यांच्या मंडळास दोन जागा मिळाल्या. कांबी येथे बप्पासाहेब पारनेरे, सुनिल राजपूत यांच्या विश्वासानंद मंडळास नऊ तर सुरेश होळकर यांच्या सदगुरु विश्वासानंद या मंडळास दोन जागा मिळाल्या. भाविनिमगाव येथे मिलींद कुलकर्णी यांच्या मंडळाने सर्व ११ जागेवर विजय मिळवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT