Employee beaten for taking action against a doctor walking around without a mask
Employee beaten for taking action against a doctor walking around without a mask 
अहमदनगर

विनामास्क फिरणाऱ्या डॉक्टरवर कारवाई, कर्मचाऱ्याला जबर मारहाण

सकाळ डिजिटल टीम

नगर ः सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. त्यानुसार कारवाई करीत असलेल्या महापालिका पथकातील कर्मचारी विष्णू देशमुख यांना सायंकाळी सहाच्या सुमारास मारहाण झाली.

या संदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात डॉ. पुरुषोत्तम आहुजा यांच्यावर, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला. 

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिकेची प्रभाग समितीनिहाय चार पथके तयार केली आहेत. सावेडीतील पथक काल सायंकाळी सहा वाजता प्रेमदान चौकात कारवाई करीत होते. त्यावेळी दुचाकीवरून मास्क न वापरता जाणाऱ्या डॉ. पुरुषोत्तम आहुजा यांना पथकाने अडविले. त्यावेळी त्यांनी देशमुख यांच्याशी वाद घातला, तसेच त्यांना मारहाण केली. यात देशमुख यांचा चष्मा फुटला, कपाळाला जखम झाली. पथकाने तातडीने तोफखाना पोलिस ठाणे गाठले. घटना समजताच महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाले. 
 

पोलिसांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्याला मारहाण होणे ही गंभीर बाब आहे. मार खाऊन काम करा, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नाहीत. पोलिस संरक्षण मिळेपर्यंत मास्क न वापरणाऱ्यांकडून दंडवसुलीची मोहीम बंद ठेवत आहोत. 
- अनंत लोखंडे, अध्यक्ष, महापालिका कामगार संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT