Former MLA Shivaji Kardile has told the opposition that everyone got an answer from my victory
Former MLA Shivaji Kardile has told the opposition that everyone got an answer from my victory 
अहमदनगर

"माझ्या विजयातून प्रत्येकाला उत्तर मिळाले"

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : राजकीय जीवनात पहिल्या दिवसापासून संघर्ष करावा लागला. त्यातून सत्ता मिळत गेली. संघर्ष माझ्या रक्तातच आहे. संघर्ष असल्याशिवाय मलाही करमत नाही. राजकारणात नेहमीच गरीबांचे प्रश्‍न मांडले आणि सोडविले. जिल्हा बॅंकेचे कर्मचारी, सोसायट्यांच्या सचिवांसाठी महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम केले. जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या मतांवर मी संचालक झालो. माझ्या विजयातून प्रत्येकाला उत्तर मिळाले, असा टोला माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी विरोधकांना लगावला.

नगर तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कर्डिले म्हणाले, जिल्हा बॅंक निवडणुकीत बिनविरोध निवड झाली नाही, हेच बरे झाले. अन्यथा कारखानदार असणारे प्रस्थापित म्हटले असते, की आमच्यामुळेच तुम्ही संचालक झाले. जिल्हा बॅंकेत कर्डिलेंनी नव्हे, तर कारखानदारांनी धुडगूस घातला आहे.'
 
जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल नगर तालुका खरेदी-विक्री संघातर्फे अध्यक्ष सुरेश सुंबे यांच्या हस्ते कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष छत्रपती बोरुडे, संचालक प्रा. संभाजी पवार, अंबादास बेरड, अंबादास शेळके, ज्ञानदेव शिंदे, जगन्नाथ कराळे, अनिल ठोंबरे, लक्ष्मण नरवडे, श्रीकांत जगदाळे, आप्पासाहेब कुलट आदी उपस्थित होते. 

सुंबे म्हणाले, की कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे कामकाज चालते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम ते करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

SCROLL FOR NEXT