Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Chinmay Mandlekar: अभिनेते रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा मुलाखतीत चिन्मयनं सांगितला.
Chinmay Mandlekar
Chinmay Mandlekaresakal

Chinmay Mandlekar: अभिनेता चिन्मय मांडलेकरनं मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. चिन्मयनं विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. चिन्मय हा विविध मुलाखतींमध्ये त्याच्या करिअरबाबत भरभरुन बोलत असतो. नुकतीच चिन्मयनं मित्र म्हणे, या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं विविध किस्से सांगितले आहेत. अभिनेते रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा देखील या मुलाखतीत चिन्मयनं सांगितला.

चिन्मयनं सांगितला किस्सा

रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा सांगताना चिन्मय म्हणाला, "एनएसडीमध्ये सेंकड ईअरला असताना आम्हाला डिसेंबर महिन्यात सुट्ट्या लागल्या होत्या. तेव्हा आम्ही काही विद्यार्थ्यांनी ठरवलं की, घरी न जाता नाटकाचा दौरा करायचा. आम्ही सर्व विद्यार्थी म्हैसूरला नाटकाच्या दौऱ्यासाठी गेलो होतो. तिथे असताना आम्हाला कळालं होतं की, आशिष विद्यार्थी हे म्हैसूरमध्ये शूटिंग करत आहेत. आम्ही आशिष विद्यार्थींना भेटलो. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की, मी बाबा नावाच्या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. ज्यामध्ये रजनीकांत हे हिरो आहेत. रजनीकांत यांना आम्हाला भेटायचं आहे, असं आम्ही आशिष विद्यार्थी यांना सांगितलं. फोन करुन कळवतो, असं तेव्हा आशिष विद्यार्थींनी आम्हाला सांगितलं. आमच्या पूर्ण बॅचमध्ये फक्त एकाकडे फोन होता. त्या फोनवर आशिष सरांचा फोन येणार, म्हणून आम्ही लक्ष ठेवून होतो."

चिन्मय म्हणाला, "एकतर ते मुस्काटात मारतील, नाही तर चालते व्हा म्हणतील"

पुढे चिन्मयनं सांगितलं, "आमचा शो संपल्यानंतर आशिष विद्यार्थींचा आम्हाला फोन आला. ते म्हणाले की, भेटायला या. मग आम्ही सगळे गेलो. मला वाटलं की, ते 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवतील, पण खूप साधं हॉटेल होतं. माझ्यासमोर एक माणूस होता, त्यानं अगदी साधे कपडे घातले होते मला वाटलं रजनीकांत यांच्या टीममधील कोणता तरी माणूस असेल, पण तेच रजनीकांत होते. मग त्यांनी आमच्यासोबत गप्पा मारल्या. ते काय बोलत होते, त्याच्याकडे माझं लक्ष नव्हतं, कारण त्यांच्या चित्रपटांचा विचार माझ्या मनात येत होता. तेव्हा माझ्याकडे एक गॉगल होता. तो गॉगल मी त्यांच्या पुढे ठेवला आणि म्हणालो, सर प्लिज एकदा तुमची स्टाईल करुन दाखवा ना. मला वाटलं, एकतर ते मुस्काटात मारतील, नाही तर चालते व्हा म्हणतील. पण त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांची स्टाईल करुन दाखवली."

Chinmay Mandlekar
Chinmay Mandlekar: "महाराष्ट्रामधील मुलांच्या डीएनएमध्ये तीन नावं असतात..."; चिन्मय मांडलेकरचं भाषण ऐकलंत का?

चिन्मय मांडलेकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चिन्मयनं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून चिन्मयनं त्याच्या मुलाच्या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल सांगितलं. व्हिडीओमध्ये चिन्मयनं या पुढे छत्रपती शिवरायांची भूमिका न साकारण्याच्या त्याच्या निर्णयाबद्दल देखील सांगितलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com