Good days for planting medicinal plants Radhakrishna Vikhe Patil shirdi
Good days for planting medicinal plants Radhakrishna Vikhe Patil shirdi sakal
अहमदनगर

शिर्डी : औषधी वनस्पती लागवडीला चांगले दिवस : विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : औषधी व सुगंधी वनस्‍पती लागवडीत सी-मॅपसारख्‍या संशोधन संस्थांनी मार्गदर्शनासाठी पुढाकार घेतला, ही स्वागतार्ह बाब आहे. या वनस्‍पती लागवडीतून रोजगाराच्‍या संधी आणि चांगल्या उत्पन्नाची हमी मिळाली, तर महिला बचतगट त्यासाठी पुढे येतील. त्यांना प्रवरा सहकारी बॅंकेच्‍या माध्‍यमातून कर्जाची उपलब्‍ध करून देता येईल, असे प्रतिपादन आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. लोणी येथील जनसेवा फाउंडेशन, राहाता पंचायत समिती आणि लखनौ येथील सी-मॅप या संशोधन संस्‍था यांच्‍यातर्फे औषधी, सुगंधी वनस्‍पती लागवड व फुलशेतीच्‍या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सी-मॅप संस्‍थेचे संचालक डॉ. प्रबोधकुमार त्रिवेदी, प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. आलोक कार्ला, निदेशक डॉ. महेंद्र दारोरकर, ‘झेडपी’च्‍या माजी अध्‍यक्षा शालिनी विखे पाटील, रणरागिणी महिला मंडळाच्‍या अध्‍यक्षा धनश्री विखे पाटील, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. संभाजी नालकर, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचे सह मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, की औषधी वनस्‍पतींबाबत केंद्राने महत्त्वपूर्ण धोरण घेतले. मात्र, त्यासाठी बॅंका अर्थसाहाय्य करीत नाहीत. प्रवरा बॅंकेच्या माध्यमातून त्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची आपली तयारी आहे.

राज्‍यात सी-मॅपच्‍या माध्‍यमातून सुगंधी औषधी वनस्‍पती लागवड मार्गदर्शन सुरू आहे. सुंगधी तेलाची मागणी भविष्‍यात वाढेल. राहाता तालुक्यातील जनसेवा फाउंडेशन आणि सी-मॅपच्‍या माध्‍यमातून सुरू होत असलेला हा प्रकल्‍प त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे.

- डॉ. प्रबोधकुमार त्रिवेदी, संचालक, सी-मॅप

लखनौ येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्‍या स्थानिक प्रतिनिधींना प्रमाणपत्रे दिली. उमेद महाराष्‍ट्र ग्रामीण जीवनोन्‍नती अभियान योजनेतून राहाता तालुक्‍यातील ७० बचतगटांना एक कोटी ६१ लाख ३६ हजार रुपयांच्‍या धनादेशांचे वितरण करण्यात आले.

- शालिनी विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष

सी-मॅपच्‍या माध्‍यमातून फुलशेतीवरदेखील संशोधन सुरू आहे. सुगंधी तेलनिर्मितीबरोबरच फुलशेती आणि मधुमक्षिकापालन या पूरक उद्योगातून चांगले उत्पन्न मिळू शकते.

- डॉ. अलोक कार्ला, शास्त्रज्ञ, सी-मॅप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT