Good news: "The corona report will be available at this hospital within eight hours 
अहिल्यानगर

गुड न्यूज ः "या' हॉस्पिटलमध्ये मिळणार आता आठ तासांच्या आत कोरोना रिपोर्ट 

विनायक लांडे

नगर ः ""कोरोनाला लगाम लावण्यासाठी कोरोना चाचणीचे अहवाल जलदगतीने येणे आवश्‍यक आहे. यापूर्वी फक्त सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णाला डॉक्‍टरांनी दिलेल्या चिट्ठीद्वारेच चाचणी करता येत होती. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात नमुने गोळा केले जात होते. त्यामुळे रिपोर्ट येण्यास विलंब लागत होता. याच दरम्यान कोरोना संसर्गाचा धोका देखील वाढून चाचणी निकाल येईपर्यंत रुग्णावर कुठल्याही प्रकारचे उपचार करता येत नव्हते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. 

कोरोनाच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ, रिपोर्ट येण्यासाठी लागणारा वेळ, त्यामुळे वाढणारा धोका लक्षात घेऊन, डॉक्‍टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रॅपिड टेस्टिंग मशिन आजपासून उपलब्ध करण्यात आली. कोरोना चाचणीचा निकाल अवघ्या आठच तासांत मिळणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होऊन रुग्णावर त्वरित उपचार करता येईल,'' असा विश्‍वास खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. 

सरकारने डॉक्‍टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ठरवून दिलेल्या दराप्रमाणे कोरोनाची चाचणी करता येणार आहे. त्या चाचणीला इंडियन मेडिकल कौन्सिल अँड रिसर्चची (आयसीएमआर) मान्यता असल्याने नागरिकांना पुढील उपचार तातडीने घेता येणार आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT