Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

Jitendra Awhad Apologizes After Row Over Remarks on Chhatrapati Shivaji Maharaj: सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना माफी मागण्याचे आदेश दिले.
Jitendra Awhad

Jitendra Awhad

esakal

Updated on

मुंबई: विधानसभेत सोमवारी धर्मस्वातंत्र्य विधेयकावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला. महाराजांसंदर्भात आव्हाड यांनी केलेल्या या विधानावर सत्ताधारी पक्षाने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या माफीची आणि निलंबनाची जोरदार मागणी केली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने, अध्यक्षांच्या निर्देशानंतर आव्हाड यांनी माफी मागितली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com