Health Minister Rajesh Tope
Health Minister Rajesh Tope images by esakal
अहमदनगर

आरोग्य मंत्र्यांनी केले आरोळे यांच्या आरोग्य सेवेचे कौतुक

सुस्मिता वडतिले

जामखेड (अहमदनगर) : जामखेड ग्रामीण आरोग्य प्रकल्पाअंतर्गत राबविल्या उपचार पध्दतीमुळेच कोरोना रुग्णांचा "मृत्युदर" नगण्य असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण खूपच चांगले आहे. त्यामुळे येथील उपचार पद्धतीची माहिती संचालक रवी आरोळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सादर केली आहे. त्यामुळे जामखेडच्या धरतीवर राज्यातील अन्य भागांमध्ये अशाच पध्दतीचे कोवीड सेंटर व उपचार पद्धती सुरू करता येईल का ? यावर 'तज्ञ' मंडळी अभ्यास करणार आहेत.

रँमन मँगसेस पुरस्कार विजेते स्वर्गीय डॉ. रजनीकांत आरोळे आणि स्वर्गीय डॉ. मेबल आरोळे या दामपत्यांनी परदेशातील आरोग्य विद्यापीठाच्या नामांकित महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून 50 वर्षापूर्वी जामखेड सारख्या ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे काम सुरू केले. त्यावेळी काँलरा, पटकी सारख्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविले होते. क्ष-रोग, कुष्ठरोग यावरही मोठे काम उभे केले. गरोदर माता संगोपनात त्यांनी उल्लेखनीय काम करुन बालमृत्यूचे प्रमाण कमी केले. त्यामुळे जागतिक स्तरावर रँमनमँगसेस पुरस्काराने दोघा पती-पत्नीचा सन्मान झाला. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी म्हणजेच डॉ. शोभाताई आरोळे आणि रवी आरोळेंनी आपले काम सुरू ठेवले.

गेली वर्षभरापासून त्यांनी कोवीड सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची विनामूल्य सेवा केली. त्यांनी कोविड सेंटरमधील डाँक्टरांनी ICMR मान्यताप्राप्त औषधं वापरुन एक स्वतंत्र उपचार पद्धती यशस्वीपणे राबविली. रेमडेसिवीर या महागड्या औषधाचा कमीत कमी वापर केला आणि तीन हजार सातशे रुग्णांना बरं केलं.

या सेंटरचा मृत्युदर हा सरासरीपेक्षाही खूपच कमी म्हणजेच अवघा ०.६४ % आहे. येथे रविवारी (ता.11 ) रोजी पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकानेही त्यांच्या या रुग्णसेवेचं कौतुक केलं. दरम्यान ग्रामीण आरोग्य प्रकल्पातील उपचार पध्दतीची माहिती संचालक डॉ. रवी आरोळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यू दर रोखण्यासाठी उपयोगी पडेल हे मात्र निश्चित..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT