Increase in infectious diseases due to non-use of masks 
अहिल्यानगर

मास्क हटले, आजार वाढले!

‘इन्फेक्शन’चा फटका; पोस्ट कोविडचाही परिणाम

मुरलीधर कराळे

अहमदनगर - पावसाळा सुरू झाल्यानंतर दूषित पाणी, तसेच बदलत्या हवामानामुळे आजार वाढू लागले आहेत. विशेषतः बालरुग्णालयांमध्ये सध्या गर्दी वाढली आहे. कोरोनानंतर कमी झालेली प्रतिकारशक्तीही ज्येष्ठ व्यक्तींच्या आजारास कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मास्कचा वापर होत नसल्याने मागील वर्षीच्या तुलनेत संसर्गजन्य आजार वाढल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्यात धरण, तळी, विहिरींमध्ये नवीन पाण्याची आवक होते. हे पाणी प्रदूषित झालेले असते. पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे पाइप फुटलेले असल्यास नाल्यातील पाणी पाइमध्ये घुसून प्रदूषण वाढते. अशा दूषित पाण्यामुळे आजार वाढतात. दलदलीमुळे डासांचे वाढते प्रमाणही आजारपणाला कारणीभूत ठरते. हे आजार प्रत्येक वर्षी येत असले, तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला आल्यास लोक घाबरून जात आहेत. जिल्ह्यात कोरोनाचेही रुग्ण वाढत आहेत. आज ८९ रुग्ण आढळले. साहजिकच, लोकांमध्ये भीती आहे. त्यामुळे काळजी घेणे, मास्क वापरणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

का वाढतात आजार?

  • पावसाचे पाणी फुटलेल्या पाइपलाइनमध्ये घुसून पाणी दूषित होते

  • आर्द्रता वाढल्याने जंतूंच्या वाढीस पोषक वातावरण

  • स्वच्छ पाणी साठविल्याने डासांचा उपद्रव

  • दूषित अन्नपदार्थ खाण्यात आल्याने धोका

  • उघड्यावरील पदार्थांवर माश्‍या बसून जंतुसंसर्ग

  • मास्क न वापरल्याने एकमेकांपासून संसर्ग

  • सर्दी, खोकल्याचे रुग्ण रुमालही वापरत नसल्याने संसर्ग

हे आवर्जून करा...

  • हात साबणाने वारंवार स्वच्छ धुणे आवश्यक

  • कार्यालय, घरांची स्वच्छता ठेवा

  • सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सफाईबाबत अधिक काळजी घ्यावी

  • कच्च्या भाज्या, फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत.

  • पाण्यात जंतुनाशकांचा पुरेसा वापर हवा

  • गरजेनुसार पाणी उकळून प्यावे

कोरोना वाढतोय

शनिवारची (ता. १६) आकडेवारी

नगर शहर १६, शेवगाव १४, भिंगार १२, श्रीरामपूर १०, राहाता ८, पारनेर ७, नगर तालुका ६, पाथर्डी ६, संगमनेर ४, जामखेड २, नेवासे १.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Address: विराट-अनुष्का यांचा लंडनमधील पत्ता सापडला? माजी इंग्लिश खेळाडूने दिली हिंट

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

पास की नापास? प्रेक्षकांना कसा वाटला 'हळद रुसली कुंकू हसलं' चा पहिला भाग? म्हणाले- पाव्हणं...

Latest Maharashtra News Updates : 30 महिला अधिकाऱ्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

SCROLL FOR NEXT