kus roga
kus roga 
अहमदनगर

या रोगामध्ये झाली वाढ 

दौलत झावरे

अहमदनगर : जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलनाचे काम सुरू असले, तरी रुग्णांचा आलेख वाढता आहे. जिल्ह्यात तीन वर्षांत 666 रुग्ण आढळून आले. मागील दोन वर्षांत त्यात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. 


जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन मोहीम आशा कर्मचाऱ्यांमार्फत राबविली जाते. या मोहिमेत संशयित रुग्णांची नोंद केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी केली जाते. त्यात कुष्ठरोगाचे निदान झाल्यास रुग्णांसाठी बहुविध औषधोपचार पद्धती सुरू करण्यात येते. कुष्ठरोगाच्या निदानाप्रमाणे सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर सहा ते एक वर्षापर्यंत मोफत औषधोपचार केला जातो. या मोहिमेत आशा कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असतो. रुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधांचा पुरवठा करणे, हे त्यांचे महत्त्वाचे काम आहे. त्यात असांसर्गिक रुग्ण बरा झाल्यानंतर 400 रुपये, तर सांसर्गिक रुग्ण बरा झाल्यानंतर 600 रुपये मानधन आशा कर्मचाऱ्यांना मिळते. 


सध्या कोरोनाच्या संकटात कुष्ठरुग्ण औषधांपासून वंचित राहू नयेत म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक रुग्णाला दोन महिन्यांची औषधे पुरविली असून, त्यांच्या प्रकृतीचा आढावा आशा कर्मचाऱ्यांकडून घेतला जात आहे. 


कुष्ठरोगाची लक्षणे 
त्वचा तेलकट, गुळगुळीत, सुजलेली व लालसर होते. नंतर कानांच्या पाळ्या जाड होतात. भुवयांचे केस विरळ होतात. अंगावर गाठी येतात. शरीरावर त्वचेपेक्षा फिकट लालसर रंगाचा, त्रास न देणारा डाग किंवा चट्टा दिसतो. हाता-पायांना बधिरता, स्पर्शज्ञान नसते. स्नायूंचा अशक्तपणा व विकृती येते. 

रुग्णांची वर्षनिहाय आकडेवारी 
2017-18 : 197 
2018-19 : 218 
2019-20 : 251 


कुष्ठरोग आनुवंशिक नाही. हा रोग बहुविध औषधांच्या नियमित सेवनाने शंभर टक्के बरा होतो. त्यामुळे काही लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे. 
- डॉ. शरद काळे, सहायक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग 

 
जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे. आशा कर्मचाऱ्यांमार्फत, घरोघरी जाऊन संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. ही मोहीम गतिमान केली असून, जिल्हा लवकरच कुष्ठरुग्णमुक्त होईल. 
- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT