It is unknown at this time what he will do after leaving the post
It is unknown at this time what he will do after leaving the post 
अहमदनगर

होमगार्डची 'निष्काम' सेवा' जाचक अटीत! वर्षभर कामाची नाही शाश्वती

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : 'निष्काम सेवा'चे व्रत घेऊन पोलिस प्रशासनाला कायदा व सुव्वस्था राखण्यासाठी दिवसरात्र सहकार्य करणाऱ्या होमगार्डना (गृहरक्षक) वर्षभर काम मिळेल, अशी हमी न देण्यासोबतच आदी जाचक अटी लादण्यात आल्याने होमगार्डचे भविष्य अंधारमय झाले आहे. विविध धार्मिक कार्यक्रमा दरम्यान गावागावांत शांतता राखण्याच्या हेतुने होमगार्डची नियुक्ती केली जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन काळात होमगार्डनी चोख कर्तव्य बजावल्याने पोलिस प्रशासनावरील कामांचा मोठा ताण ही हलका झाला होता. पोलिस प्रशासनाच्या अधीन राहून होमगार्ड  दिवसरात्र कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी चोखपणे पार पडतात. यापूर्वी या होमगार्डची नियुक्ती करतांना किंवा नियुक्तीनंतर लागू केलेल्या अटी काही प्रमाणात सौम्य होत्या. त्यामुळे गृहरक्षक जवानांना वर्षेभर काम मिळत होते.

ऑनलाईन अर्ज करणे, नोंदणी करणे जिल्ह्यातील होमगार्डच्या याद्या जिल्हा व मुख्य कार्यालयाशी लिंक करणे असे काही प्रकार नव्हते. परंतु, पोलिस विभागाला कायमस्वरूपी होमगार्ड लागल्यास पुरविण्याचे आश्वासन सरकारने जिल्हा समादेशकाना दिले तर दुसरीकडे नवीन आदेश काढून अडचणी वाढवल्या, बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असणाऱ्या होमगार्डच्या जिल्हानिहाय याद्या मुख्यालयाद्वारे लिंक कराव्यात व होमगार्डला कायम कर्तव्यावर ठेवण्यात येईल. याबाबत आश्वासन देऊ नये, असे राज्य कार्यालयाने जिल्हा समादेशकांना बजावले आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे होमगार्ड च्या सेवेला राज्य कार्यालयाच्या नवी आदेशानुसार नवीन अटी लागू करण्यात आल्या. नवीन आदेशानुसार आनलाईन संगणक प्रणालीशिवाय नियुक्ती होणार नाही, वर्षभर काम मिळेलच याची हमी नाही, या अटी मान्य केल्या तरच तात्पुरती नियुक्ती मिळणार असल्याने होमगार्डसमध्ये नाराजी पसरली आहे.

होमगार्डवर उपासमारीची वेळी 
नेवासे तालुक्यात एकूण १३७ होमगार्ड असून त्यात १३३ पुरुष व ४ महिला आहे. दरम्यान  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ४५ वर्षांच्या पुढील होमगार्डला बंदोबस्त न  देण्याचा निर्णय घेतल्याने नेवासे तालुक्यातील ५१ होमगार्ड गेल्या आठ महिन्यांपासून विना मानधन  घरीच असल्याने व   जे कर्तव्यावर आहे त्यांना 'निधी' उपलब्ध नसल्याचे  कारणाने गेली तीन महिन्यापासून मानधन न मिळाल्याने यासर्वांवरच उपासमारीची वेळ आली आहे.

"पोलीस प्रशासनाला बंदोबस्तात सहकार्य करणाऱ्या होमगार्ड हा शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. होमगार्डच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या शासन दरबारी मांडण्यात आल्या आहेत. त्याचा पाठपुरावा ही आमच्याकडून चालू आहे. या मागण्या निकाली काढून होमगार्डला शासनाने न्याय द्यावा हीच अपेक्षा. 
- बाळासाहेब देवखिळे, प्रभारी  समादेशक अधिकारी, नेवासे 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT