Jamkhed's pre-election poll has arrived
Jamkhed's pre-election poll has arrived 
अहमदनगर

जामखेडचा प्री इलेक्शन पोल आलाय, राम शिंदेंनी केला भाजपच्या विजयाचा दावा

वसंत सानप

जामखेड : "जामखेड नगरपालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात येईल, असा प्री-ईलेक्शन पोल आला आहे. त्याहीपेक्षा चांगला 'परफॉर्मन्स' आम्ही देवू. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्जत-जामखेडचे दोन्ही संचालक भाजपचे निवडून आले. यावरून चित्र स्पष्ट होतंय. मतदारांनाही कळलयं मोठ्याच्या घरी पोरगी द्यायची अन् भेटायची अडचण करून घ्यायची. कार्यकर्त्यांची लोकप्रतिनिधीला भेटताना किती अडचण होते, याचा अनुभव दीड वर्षात अनेकांनी घेतलाय. त्यामुळे यापुढे चित्र बदललेले दिसेल. बँकेच्या संचालकांपाठोपाठ जामखेड नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणारच", असा विश्वास माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

जामखेड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी मंत्री शिंदे बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रदेश संघटक गणेश अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, निवडणूक निरिक्षक अॅड. अभय आगरकर, जिल्हा विधी अध्यक्ष अँड. प्रवीण सानप, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, तालुका सरचिटणीस लहू शिंदे, सभापती गौतम उतेकर, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अभिजित राळेभात आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

राम शिंदे म्हणतात, मी नशिबवान माणूस

या वेळी माजी मंत्री शिंदे म्हणाले, "मी नशिबवान माणूस आहे. ग्रामपंचायतीला पडलो आणि थेट विधानसभेला लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सहकार्याने आमदार झालो, मंत्रीही झालो. असे फक्त भाजपातच होऊ शकते. असे सांगून मंत्री असताना त्यांनी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. विधानसभेला झालेल्या अनपेक्षित पराभवाची सल व्यक्त करताना ते म्हणाले, मंत्री असताना नगरपालिकेची सत्ता विरोधात गेली होती. तरीही शहराला कोट्यवधीचा निधी दिला. विकासाची कामे केली. त्यापैकी काही सुरू आहेत. एकशे सतरा कोटींच्या पाणीपुरवठा योजनेलाही आपणच मंजुरी आणली होती. अद्यापि तिची निविदा ही निघाली नाही, असा उपरोधिक टोला माजी मंत्री शिंदे यांनी मारला. 

माझी परीक्षा बघू नका...काम करणाराला उमेदवारी

आता तुम्ही मात्र माझी आता ऐवढी परीक्षा पाहू नका, असे सांगून नगरपालिकेला साथ देण्याचे आवाहन केले. उमेदवारीविषयी बोलताना शिंदे म्हणाले, वार्डात काम करणाऱ्यांस  निवडून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवारी दिली जाईल. कोणी इकडे तिकडे पळू नका. आपल्या वार्डात काम करा; पक्ष तुम्हांला घरी येवून उमेदवारी देईल," असेही त्यांनी सांगितले.

एकदा फसवता येतं, दुसऱ्यांदा नाही

कर्जतकर म्हणाले, "आमदार रोहित पवार बहुतेक पुढची निवडणूक कर्जत-जामखेडमधून लढणार नाहीत, तर करमाळ्यातून लढतील. त्यांचे करमाळ्याकडे अधिक लक्ष आहे. म्हणूनच त्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवायला घेतलाय. लोकांना एकदा फसवता येते. मात्र, वारंवार फसवता येत नाही; अशीही टीका त्यांनी केली. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचीच सत्ता जामखेड नगरपालिकेत येईल, असा विश्वास व्यक्त केला.

अॅड. आगरकर, मुंडे, सुधीर राळेभात, अॅड. हिरालाल गुंदेचा, अजय काशीद, विठ्ठल राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड प्रवीण सानप यांनी केले. आभार प्रा. कविता जगदाळे यांनी मानले.

सुधीर राळेभात यांचे रोहित पवारांना चॅलेंज

माजी मंत्री राम शिंदे  यांनी पाच वर्षांत आणलेल्या निधीच्या पंचवीस टक्के निधी आमदार रोहित पवारांनी आणून दाखवावा, असे आव्हान सुधीर राळेभात यांनी दिले. दीड वर्षात आमदारांनी एकही विकासाच काम केलं नाही, त्यांचा विकास फक्त मीडियातूनच दिसतो, अशी टीकाही त्यांनी केली. सुधीर यांचे बंधू अमोल यांना बिनविरोध निवडून आणण्यात रोहित पवार यांचा महत्त्वाचा वाटा होता. तेव्हा सुधीर राळेभात म्हणाले होते, आम्ही वरच्या राजकारणात विखेंसोबत तर खालच्या राजकारणात रोहित पवार यांच्यासोबत आहोत. आता त्यांनी स्टँड बदलल्याने राळेभात बंधूंच्या राजकारणाची चर्चा सध्या दोन्ही तालुक्यात सुरू आहे. संपादन - अशोक निंबाळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT