Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Nitesh Rane: पण त्यापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये पक्ष फुटूनही उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसल्याचे दिसत नाही. अनेक पोल्सनी ठाकरे यांचा पक्ष राज्यात दोन नंबरच्या जागा जिंकेल असा दावा केला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Esakal

उद्धव ठाकरे आणि राणे कुटुंबियांचा वाद राज्याला नवा नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दोन्ही मुले माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. तर ठाकरेंकडून राणेंच्या टीकेला खासदार संजय राऊत उत्तर देत असतात.

आता आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरीतील एका पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यामुळे देशातील राजकारण ढवळून निघणार आहे.

नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना पुन्हा एनडीएमध्ये यायचे आहे. आणि ते यासाठी काय काय करत आहेत याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहेत.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे खरंच वीस दिवसांमध्ये NDA मध्ये येतील का? आमदाराचा नेमका दावा काय?

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीसमोर नाक रगडतात आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात. लोकसभा निवडणुकी दरम्यान सांगलीच्या जागेवरून जो राडा झाला त्यावरून ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आहेत. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.

नितेश राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांची एनडीएमध्ये येण्यासाठी कोणाबरोबर बैठक झाली याचे त्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे म्हटले आहे. तसेच ठाकरे एनडीएला बिनशर्त पाठिंबा देतो म्हणल्याचा दावा राणेंनी केला आहे.

Uddhav Thackeray
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला गावातूनच विरोध, उपसरपंचासह 70 ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी 48 जागांवर पाच टप्प्यांत मतदान झाले. 1 जून रोजी देशातील सर्वच जागांवरील मतदान संपले असून, चार जून रोजी निकाल लागणार आहे.

पण त्यापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये पक्ष फुटूनही उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसल्याचे दिसत नाही. अनेक पोल्सनी ठाकरे यांचा पक्ष राज्यात दोन नंबरच्या जागा जिंकेल असा दावा केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com