Kidnapping of Gautam Hiran for money
Kidnapping of Gautam Hiran for money 
अहमदनगर

हिरण हत्याकांडाचा झाला उलगडा, पाच आरोपींना अटक

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्याकांडाचा तपास समोर आला आहे. पोलिसांनी शिताफीने पाच आरोपी गजाआड करण्यात पोलीस प्रशासनाला अखेर यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सहा दिवस मेहनतीचा तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्रारंभी दोन संशयित निष्पन्न करून त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केले.

काल रात्री नाशिक येथून संदीप मुरलीधर हांडे (वय २६, रा. माळेगाव, ता. सिन्नर) याला पकडले. पुढील तपास करून अवघ्या काही तासांत जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय २५, रा. सप्तश्रृंगीनगर, नायगाव रोड, सिन्नर), अजय राजू चव्हाण (वय २६, रा. पास्तेगाव, मारुती मंदीरासमोर, सिन्नर), नवनाथ धोंडू निकम (वय २९, रा. उक्कडगाव, ता. कोपरगाव) यांच्यासह आणखी एकास विविध ठिकाणाहून अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आज ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डाॅ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांच्यासह पथकातील सहायक पोलीस निरिक्षक मिथून घुगे, गणेश इंगळे, सहायक फौजदार सोन्याबापु नानेकर, पोलीस हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विजयकुमार वेठेकर उपस्थित होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करुन गुन्ह्याचा तपास करीत होते. गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा करतांना कोणताही पुरावा मागे राहणार नाही. याची पुरेपूर काळजी घेतलेली होती. तसेच श्रीरामपूर शहर हे मोठी व्यापारी बाजारपेठ असल्याने गुन्हा घडला. त्यावेळी आणी त्यानंतरच्या काळात शहरात अनेक लोकांची ये-जा झाल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. परंतु पोलीसांनी काल रात्री नाशिक येथून संदीप हांडे याला ताब्यात घेवून कसून चौकशी केली. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जुनेद शेख, अजय चव्हाण, नवनाथ निकम यांच्यासह आणखी २२ वर्षीय एकास अटक केली.

पोलीसांनी वरील सर्व आरोपींची कसुन चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्हाची कबुली देत गुन्ह्याचा घटनाक्रम सांगितला. सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणले असून आरोपींकडून मयत हिरण यांच्या मोबाईलसह चेकबुक आणि काही कागदपत्रांसह गुन्ह्यासाठी वापरलेली (एमएच- १५- जीएल- ४३८७) क्रमांकाची मारुती व्हॅन पोलीसांनी जप्त केली आहे.

पुढील तपास पोलीस उपअधीक्षक मिटके करीत आहे. बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचे (एक मार्च) रोजी बेलापूर-राहुरी बाह्यवळण परिसरातुन सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते.

या संदर्भात पंकज हिरण यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर (सात मार्च) रोजी अपहरण केलेल्या आरोपींनी हिरण यांची हत्या करुन येथील वाकडी रस्त्यावरील यशवंतबाबा चौकी परिसरात मृतदेह आणून टाकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सदर घटनेमुळे बेलापूरसह सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती.

मृतदेह सापडल्यानंतर पोलीसांनी अपहरण केलेल्या आरोपीविरुध्द सदर गुन्ह्याचे कलमे लावली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. प्रतापराव दिघावकर, पोलीस अधीक्षक पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डाॅ. काळे यांनी बेलापूर आणि वाकडी शिवारात भेट देवून तपासाची चक्र फिरवुन चार पथके रवाना केली.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली संदीप घोडके, विश्वास बेरड, पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, रवि सोनटक्के, विजय ठोंबरे, सचिन आडबल, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, दिपक शिंदे, विशाल गवांदे, पोलीस शिपाई योगेश सातपूते, संदीप दरंदले, रविंद्र डुंगासे, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, मयूर गायकवाड, मेघराज कोल्हे, राहूल सोळूंके, रोहीत येमूल, आकाश काळे, उमाकांत गावडे, भरत बुधवंत, अर्जून बडे, बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर यांच्यासह सायबर सेलचे पोलीस नाईक फुरकान शेख, पोलीस शिपाई प्रमोद जाधव यांनी केली.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT