marital suicid
marital suicid Sakal
अहमदनगर

विवाहितेची आत्महत्या; पती, सासऱ्याला कोठडी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती व सासरा या दोघांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

अरणगाव (ता. नगर) येथील रहिवासी वनिता सागर चव्हाण (वय २५) हिने सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरी बुधवारी (ता. ८) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा पती सागर (वय ३०) आणि सासरा मेनशर रामभाऊ चव्हाण (वय ५०) या दोघांनी तिला उपचारासाठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात आणले होते. तिचे नातेवाईक सोमनाथ सोनगीर काळे (वय ५५, रा. सोनेसांगवी, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात वनिताचा पती सागर आणि सासरा मेनशर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपनिरीक्षक रणजित मारक आणि सरकारी वकील अनिकेत आव्हाड यांनी या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी दोन्ही आरोपींच्या सात दिवस पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT