Israel-Hamas War
Israel-Hamas WarEsakal

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Israel-Hamas War: इस्राइलच्या बॉम्बहल्ल्यापासून वाचण्यासाठी गाझामधील रफाहमध्ये मोठ्या संख्येने लोक आश्रय घेत आहेत. इजिप्तने होस्ट केलेल्या हमासच्या नेत्यांसोबत इस्राइलसोबतच्या युद्धबंदीबाबत संभाव्य चर्चा होऊ शकते अशा वेळी हा बॉम्बहल्ला करण्यात आला आहे.

इस्राइल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरूच आहे. तर युद्धबंदीच्या चर्चेदरम्यान, इस्राइलने दक्षिण गाझामधील रफाह शहरावर हवाई हल्ले केला आहे, या हल्ल्यात 13 लोक ठार झाले आणि तर अनेक जण जखमी झाले आहेत. इस्त्रायली बॉम्बहल्ल्यापासून वाचण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रफाहमध्ये आश्रय घेत आहेत. इजिप्तने होस्ट केलेल्या हमासच्या नेत्यांसोबत इस्राइलसोबतच्या युद्धबंदीबाबत संभाव्य चर्चा होऊ शकते अशा वेळी हा बॉम्बहल्ला करण्यात आला आहे.

इस्राइलने हमासला पुर्णपणे नष्ट करणार असल्याचं म्हटलं आहे. इस्राइलने हमासचा खात्मा करण्यासाठी सुरू केलेल्या लष्करी कारवाईत 34,000 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धामुळे 23 लाख लोकांना स्थलांतरीत व्हावे लागले आहे. हमासच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, खलील अल-हया यांच्या नेतृत्वाखाली हमासचे अधिकारी युद्धविराम प्रस्तावावर चर्चा करतील, ज्यामध्ये कतार आणि इजिप्त मध्यस्थीची भूमिका बजावत आहेत.

Israel-Hamas War
Elon Musk: भारत दौरा पुढे ढकलणारे इलॉन मस्क अचानक चीनला रवाना, जाणून घ्या काय आहे कारण

हमासने पुन्हा 'टू नेशन थिअरी'वर करार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पॅलेस्टिनी संघटना हमास 15 वर्षांहून अधिक काळापासून म्हणत आहे की, ते इस्राइलसोबत द्विराष्ट्रीय करार स्वीकारू शकतात. पण इस्राइल विरोधातील सशस्त्र लढा सोडणार हे सांगण्यासही हमासने नकार दिला आहे.

इस्राइल आणि हमासचे युद्ध कसे सुरू झाले?

इस्राइल आणि हमास यांच्यात गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. हमासने इस्राइलवर पाच हजारांहून अधिक क्षेपणास्त्र डागले होते. त्यानंतर इस्राइलने युद्धाची घोषणा केली होती. इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.

Israel-Hamas War
Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

इस्राइलने हमासच्या हल्ल्याला अशा प्रकारे प्रत्युत्तर दिले की, गाझामध्ये एक-दोन हजार नाही तर 34 हजार पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. मरण पावलेल्यांपैकी 70 टक्के स्त्रिया आणि लहान मुलांचा समावेश होता. यापैकी अंदाजे 14,350 मुले होती. प्रत्येक इस्रायलीमागे, नेतन्याहूच्या सैन्याने 27 पॅलेस्टिनींना मारले गेले आहे.

युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, मृतांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे १७० हून अधिक कर्मचारी आणि सात वर्ल्ड सेंट्रल किचन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पत्रकारांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या म्हणण्यानुसार, सहा महिन्यांत ९० हून अधिक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Israel-Hamas War
Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com