राहुरी: कोरोना रुग्णसंख्या घटत असली, तरी दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी गरजेची आहे. राहुरी डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर तज्ज्ञ डॉक्टरांच्या अधिपत्याखाली वैद्यकीय सुविधांसह सज्ज आहे. येथे कोरोना रुग्णांना घरच्यासारखी सेवा मिळेल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
नामदार प्राजक्त तनपुरे मित्रमंडळ व राहुरी तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे बालाजी मंदिर ट्रस्टच्या मंगल कार्यालयात उभारलेल्या राहुरी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. शरद धावडे होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा, सुरेश वाबळे, निर्मला मालपाणी, धनराज गाडे, नगराध्यक्ष अनिता पोपळघट, संतोष आघाव, नंदकुमार तनपुरे, नंदकुमार गागरे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे उपस्थित होते.
मंत्री तनपुरे म्हणाले, ""कोरोनाचा त्रास अंगावर काढणे जीवघेणे ठरत आहे. तरुणांमुळे घरातील वृद्ध बाधित होत आहेत. राहुरी, देवळाली प्रवरा व वांबोरी येथे प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. पालिकेस घरकुलांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. वर्षभरात लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल. मागील 10 वर्षांत ग्रामीण भागात रस्त्याची कामे झाली नाहीत.''
राहुरी महाविद्यालयातील कोविड सेंटरला शुभेच्छा आहेत; परंतु त्याच्या उद्घाटनप्रसंगी माझ्यावर राजकीय टीका उचित नव्हती. ज्यांना व्यासपीठ राहिले नाही, ते कोणत्याही व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी करीत आहेत, असा टोला मंत्री तनपुरे यांनी माजी आमदार कर्डिले यांना लगावला. डॉ. जयंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर बाचकर यांनी आभार मानले.
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.