monika rajale pratap dhakane
monika rajale pratap dhakane sakal media
अहमदनगर

एक संस्था तुम्हाला नीट सांभाळता येईना; राजळे यांचा ढाकणेंना टोला

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : अतिवृष्टीमध्ये सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले. राज्य शासनाने केवळ सहा कोटी रुपयांची मदत देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निधीचा हिशेब द्यावा. एक संस्था लोकांनी तुमच्या ताब्यात दिली तर तेथे काय उद्योग सुरू आहेत, हे सर्व तालुका पाहत असल्याचा टोला आमदार मोनिका राजळे यांनी प्रताप ढाकणे यांचा नामोल्लेख टाळून लगावला.

तालुक्यातील कळसपिंप्री येथे विविध विकासकामांचा प्रारंभ राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी विठ्ठल महाराज, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, माणिक खेडकर, सुनील ओव्हळ, सुभाष केकाण, अजय रक्ताटे, भगवान साठे, काशीबाई गोल्हार, बाबासाहेब किलबिले, दिगंबर भवार आदी उपस्थित होते.

या वेळी राजळे म्हणाल्या, की अतिवृष्टीमध्ये २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल पाठविण्यात येऊन ११ कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य करण्यात आले. प्रत्यक्षात केवळ सहा कोटी रुपये देण्यात आले. अतिवृष्टीग्रस्तांची ही चेष्टा आहे. केंद्र सरकार मोठा निधी राज्यांना देते.

निधीवाटपात आपले राज्य सरकार भेदभाव करते. राज्यात महाआघाडीचे सरकार असताना तालुक्यातील या आघाडीच्या नेत्यांनी कोणती विकासकामे केली, याचा हिशेब द्यायला हवा. एक संस्था लोकांनी तुमच्या ताब्यात दिली तर तेथे काय उद्योग सुरू आहेत, हे सर्व तालुका पाहत असल्याचा टोला त्यांनी प्रताप ढाकणे यांचा नामोल्लेख टाळून लगावला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता सज्ज राहावे, असे आवाहन राजळे यांनी शेवटी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT