nashik
nashik esakal
अहमदनगर

नाशिकची जलसंपदा कार्यालये औरंगाबादला हलविण्याच्या हालचाली?

सतीश वैजापूरकर

शिर्डी (जि.अहमदनगर) : नगर, नाशिक व मराठवाडा असा एकत्रित संबंध असलेली जलसंपदा कार्यालये (Nashik Water Resources Offices) नाशिक येथून औरंगाबाद (aurangabad) व वैजापूर येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाले, तर गोदावरी कालव्यांचे सिंचन व्यवस्थापन मराठवाड्याकडे जाईल. पाणीप्रश्नी लाभक्षेत्रातील आमदार, खासदार व शेतकरी आणखी परावलंबी होतील. ‘मराठवाडा स्पिरीट’ दाखविण्यासाठी अशा मोहिमा आखण्यात आल्या, तर मराठवाडा वगळून नगर व नाशिकसाठी स्वतंत्र ऊर्ध्व गोदावरी पाटबंधारे महामंडळ स्थापनेची जुनी मागणी पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार - डॉ. भागवत कराड

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काल औरंगाबादेत बोलताना, नाशिक येथील जलसंपदा कार्यालये औरंगाबाद व वैजापूर येथे हलविण्याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचे सूतोवाच केले. वरच्या बाजूच्या भाम, भावली, वाकी व मुकणे या मराठवाड्यासाठी असलेल्या धरणांतील पाणी पिण्याच्या नावाखाली तिकडे शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे या धरणांच्या पाण्याचे नियंत्रण मराठवाड्यातील वैजापूर पाटबंधारे कार्यालयाकडे देण्यात यावे, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. प्रत्यक्षात भाम, भावली व वाकी या तीनही धरणांना कालवे नाहीत. त्यांचे पाणी दारणा धरणात आणून ते जलद कालव्याद्वारे मराठवाड्याला दिले जाते. मुकणे धरणातील साडेचार टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी, तर अडीच टीएमसी पाणी गोदावरी कालव्यांसाठी वापरले जाते. अशा परिस्थितीत सिंचन नियंत्रण वैजापूरला गेले तर दारणाचे, म्हणजेच गोदावरी कालव्यांचे सिंचन व्यवस्थापन वैजापूर कार्यालयाकडे आपोआप जाईल. कारण नसताना गुंतागुंत व प्रादेशिक संघर्ष वाढेल.

या वरच्या बाजूच्या धरणांचे पाणी पिण्याच्या नावाखाली शेतीसाठी वापरले जाते, अशी चुकीची माहिती मंत्री कराड यांना देण्यात आली आहे. उलट, गेल्या दहा वर्षांत गोदावरी कालव्यांच्या आवर्तनांची संख्या कमी झाली आणि पाण्याअभावी खरीप, रब्बी व उन्हाळी हे तीनही हंगाम संकटात आले आहेत. याउलट, मराठवाड्यातील आठमाही जायकवाडी धरणाच्या पाणीफुगवट्यावर सव्वा लाख हेक्टर क्षेत्रात बारमाही उसाची शेती फुलली आहे. तेथील पाणीफुगवट्यासाठी स्वतंत्र वीज फिडर टाकण्याची मागणी मुद्दाम टाळली जाते.

पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी स्वतंत्र मुख्य अभियंतापद निर्माण करून या प्रकल्पाचे कार्यालय नाशिक येथे स्थापन करण्यात आले. तेथून सह्याद्रीच्या डोंगररांगा पन्नास किलोमीटर अंतरात आहेत. कार्यसुलभतेकडे दुर्लक्ष करून, येथून दोनशे किलोमीटर अंतरावरील औरंगाबादेत हे कार्यालय नेण्यात काहीच हशील नाही, असे जाणकारांचे मत आहे. केवळ मराठवाडा स्पिरीट दाखविण्यासाठी अशा मोहिमा आखल्या जात असतील तर मराठवाडा वगळून केवळ नाशिक व नगरसाठी स्वतंत्र पाटबंधारे विकास महामंडळ स्थापन करावे, ही जुनी मागणी पुन्हा जोर धरण्याची दाट शक्यता आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची भूमिका ही नगर, नाशिककरिता नेहमीच सापत्नभावाची राहिली आहे. आता नाशिकची जलसंपदा कार्यालये औरंगाबादेत हलविण्याच्या हालचालींमुळे त्याला पुष्टी मिळत आहे. कोपरगावचे माजी आमदार अशोक काळे यांनी, मराठवाडा वगळून नगर व नाशिकसाठी स्वतंत्र ऊर्ध्व गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी त्यावेळी विधिमंडळात केली. काळे कारखान्याच्या जनहित याचिकेच्या माध्यमातूनदेखील ही मागणी सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच करण्यात आली आहे. आता ही मागणी जोर धरू लागेल. - उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT