
Kolhapur Gangwar : खुनाचा प्रयत्न, मारामारीसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या साजन कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगला आज जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. टोळीत १७ संशयितांचा समावेश असून, त्यांच्याविरोधात शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. शाहूपुरी पोलिसांनी हा प्रस्ताव पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. प्रस्तावावर सुनावणी होऊन टोळीच्या हद्दपारीचा आदेश देण्यात आला.