Mumbai-Shirdi Express train will run from March 11
Mumbai-Shirdi Express train will run from March 11 
अहमदनगर

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी ः साई एक्स्प्रेस पुन्हा सुरू होतेय

सतीश वैजापूरकर

श्रीरामपूर ः मुंबई ते साईनगर शिर्डी रेल्वे सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. नित्यनेमाने शिर्डीत बाबांच्या दर्शनास जाणाऱ्यांचीही सोय झाली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. ती पूर्ववत होत आहे.

शिर्डी-दादर एक्‍स्प्रेस रेल्वे आठवड्यातून चार दिवस बेलापूर, पुण्यामार्गे 11 मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने नुकताच जाहीर केला.

साईभक्तांसह जिल्ह्यातील प्रवासी नागरिकांच्या सोयीची ही रेल्वे सुरू होत असल्याने, या निर्णयाचे स्वागत होत आहे. रविवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी साईनगर, बेलापूर, नगर, दौंड, पुणे अशी रेल्वे धावणार आहे. 

बेलापूर रेल्वेस्थानकात रात्री 9 वाजून 10 मिनिटे, नगर येथे रात्री 10 वाजून 10 मिनिटे, तर दादर (मुंबई) येथे पहाटे साडेसहा वाजता ही रेल्वे पोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01041 दादर, पुणे, साईनगर मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शनिवारी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी दादर येथून सुटेल. बेलापूर रेल्वेस्थानकावर सकाळी 7 वाजून 40 मिनिटे, तर साईनगर येथे सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी ती पोचणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT