Municipal Standing Committee Chairman Election Program Announced
Municipal Standing Committee Chairman Election Program Announced 
अहमदनगर

महापालिका स्थायी समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर

सकाळ वृत्तसेवा

नगर ः महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापती निवडीचा मुहूर्त नाशिकच्या विभागीय आयुक्‍त कार्यालयाने काढला आहे. ही निवडणूक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चार मार्चला दुपारी तीन वाजता महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत होईल. 

महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्य एक फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नुकतीच नव्या आठ सदस्यांची निवड जाहीर केली. याची माहिती व सभापती निवडणूक परवानगीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त डॉ. भोसले यांनी विभागीय आयुक्‍त कार्यालयाकडे पाठविला होता. त्यानुसार चार मार्चला दुपारी तीन वाजता निवडणूक होणार आहे. 

या निवडणुकीसाठी राजकीय सहमती झाली असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने अविनाश घुले यांना सभापती बनविण्यासाठीची व्यूहरचना आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. मात्र, हा चक्रव्यूह भेदण्यासाठी शिवसेना व भाजपमधील काही नगरसेवक प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT