Murder of workers in West Bengal in Kopargaon
Murder of workers in West Bengal in Kopargaon 
अहमदनगर

Breaking : कोपरगावमध्ये खून; पश्‍चिम बंगालमधील दोन मजुरांमध्ये वाद

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव (अहमदनगर) : शहरापासून जवळ असलेल्या रेणूकानगर येथील ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या बांधकामावर असलेल्या पश्चिम बंगाल येथील मजुरांमध्ये एकमेकांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान एकाच्या खुनात झाले.
6 जुलैला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सानू निमाई बिश्वास (वय 25,  रा. सरूलिया, मंगल कोट, छोरा बर्धमान, पश्चिम बंगाल) याला लथाबुक्क्याने व लाकडी दंडके डोक्यात मारून गंभीर जखमी करून ठार मारले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी राहुल राजव्यापारी मोंडल (रा. माजेग्राम राणाघाट, नदिया) व सुकल मंगला हेमब्राम, (रा. छोरा कॉलनी, छोरा हटला, छोरा बर्धमान बमन बाग्राम दोघे पश्चिम बंगाल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिगंबर ज्ञानदेव होगे यांनी याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. 
सदर शाळेचे बांधकाम सुरु असून या कामावर पश्चिम बंगाल येथील मजूर मोठ्या संख्येने कामावर आहेत. दरम्यान 6 जुलै रोजी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास या मजुरांचा अज्ञात कारणाने वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्या घटनेतील दोन आरोपीनीं अज्ञात कारणावरून सानू बिश्वास याचा लाकडी दांडक्याने वार करून खून केला आहे. घटनेनंतर जखमीस कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपशारासाठी दाखल केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT