Nagar District Bank has taken this decision for crop loan of farmers
Nagar District Bank has taken this decision for crop loan of farmers 
अहमदनगर

नगर जिल्हा बँकेने पीक कर्जासाठी घेतलाय हा निर्णय

दौलत झावरे

नगर ः खरीप हंगाम पीककर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची 15 ऑगस्टपर्यंत मुदत होती. मात्र, शेतकऱ्यांची मागणी व अडचणींचा विचार करून बॅंकेने वेगळा निर्णय घेतल्याची माहिती अहमदनगर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी दिली. 

जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून, शेतकऱ्यांकडून जिल्हा बॅंकेकडे मोठ्या प्रमाणावर पीककर्जाची मागणी होत आहे. बॅंकेने शेतकऱ्यांच्या विविध कार्यकारी संस्थांमार्फत कर्जमंजुरी पत्रक व पुरवणी कर्जमागणीस मंजुरी दिली. मात्र, अद्याप अनेक शेतकरी सभासदांनी कर्ज उचलले नाही. कर्जाची मागणी वाढत आहे. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात खरिपाची तयारी करीत असून, पीककर्जपुरवठा सुरळीत होत आहे. 

बॅंकेने खरिपातील पिकांसाठी कर्जवाटपास मुदतवाढ दिली. आजअखेर बॅंकेने दीड हजार कोटींचे पीककर्ज दिले आहे. शासनाने दिलेले चालू खरीप हंगामासाठीचे उद्दिष्ट (1498 कोटी) पूर्ण केल्याची माहिती गायकर व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली. 

शासनाने शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतल्याने, चालू हंगामात खरीप कर्जवाटप मोठ्या प्रमाणात होणार असल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बॅंकेने या दृष्टिकोनातून सर्व आवश्‍यक बाबींची तयारी ठेवली आहे, असे गायकर म्हणाले. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

IPL 2024 LSG vs RR Live Score : एक विजय अन् संजूच्या संघाची प्लेऑफमध्ये होणार एन्ट्री की KL राहुल घेणार बदला?

Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

SCROLL FOR NEXT