odisha trader lost son at shirdi to find him police complaint found at shirdi ahmednagar
odisha trader lost son at shirdi to find him police complaint found at shirdi ahmednagar Sakal
अहमदनगर

Ahmednagar News : अखेर बैरागी बाप-लेकाची भेट!

सतीश वैजापूरकर

शिर्डी : एखाद्या हिंदी चित्रपटात शोभावी अशी घटना साईंच्या शिर्डीत घडली. पत्नीसह भाविकांच्या जथ्थ्यासोबत आलेले ओडिशातील एक वृध्द व्यापारी कुणाच्या ध्यानीमनी नसताना भरकटले. थेट पुणतांब्याला जाऊन पोहोचले. शोकाकूल आईला धीर देण्यासाठी आणि वडिलांचा शोध घेण्यासाठी मुलगा विमानाने तातडीने शिर्डीत दाखल झाला.

पोलिसात तक्रार केली, शहरात ठिकठिकाणी त्यांचे छायाचित्र असलेली भित्तीपत्रके चिकटवली. दररोज शहर धुंडाळणे सुरू झाले. पुणतांबा येथील रिक्षा चालक अख्तर पठाण आणि शहरातील पत्रकार प्रशांत अग्रवाल यांच्या जागरूकतेमुळे आज बाप-लेकाची भेट घडली.

वडिलांना पाहताच मुलगा त्यांच्या गळ्यात पडून रडू लागला. येथील पोलिस ठाण्यात घडलेला आजचा प्रसंग पाहून उपस्थितांना गहिवरून आले.

राऊ बैरागी (वय ७०) आठ दिवसांपूर्वी त्यांच्या सोबत ओडिशातील भाविकांचा जथ्था असताना भरकटले. थेट पुणतांब्यात जाऊन पोहोचले. भाषेची अडचण आणि नेमके काय झाले हे त्यांच्या लक्षात येईना.

कुणीतरी दिलेली शाल पांघरूण ते तेथील रिक्षा स्थानकावर येऊन बसत. कुणी काही विचारले की रडू लागत. तेथील रिक्षाचालक अख्तर पठाण यांनी दोन-चार दिवस वाट पाहिली आणि शिर्डीतील एखाद्या ओरिया भाषा जाणणाऱ्याकडे घेऊन जावे असा विचार करून ते त्यांना आज शिर्डीत घेऊन आले. शिर्डीत त्यांना त्यांचे रिक्षाचालक मित्र प्रसन्ना हरणे व बाबासाहेब म्हस्के भेटले.

ते हरविल्याची बातमी पत्रकार प्रशांत अग्रवाल यांनी यू ट्यूब चॅनलवर प्रसिध्द केली होती. ही बातमी या दोघांनी पाहिली होती. त्यातील फोटो व समोरचे वृध्द गृहस्थ एकच आहेत. याची खात्री पडताच त्यांनी अग्रवाल यांच्यासोबत संपर्क साधला.

त्यांनी लगेच त्यांच्या मुलगा अजित बैरागी यांच्यासोबत संपर्क साधला. काही वेळात पोलिस ठाण्याच्या आवारात सर्व जण जाऊन पोहोचले. मुलगा आणि वडिलांनी एकमेकांना पाहताच दोघांना अश्रू अनावर झाले.

तेथूनच त्यांनी आपल्या आई सोबत संपर्क साधून वडील सापडले असल्याची वार्ता घरी कळविली. या दोघा बापलेकांनी या तीनही रिक्षाचालकांचे आणि पत्रकार अग्रवाल यांचे आभार मानले.

‘अनेकदा येते भाषेची अडचण’

शिर्डीत बऱ्याचदा वृध्द मंडळी भरकटतात. भाषेची अडचण असल्याने त्यांची कुटुंबापासून ताटातूट होते. ही घटना देखील अशीच होती; मात्र पुणतांबा येथील रिक्षाचालक अख्तर पठाण यांच्यामुळे वृध्द व्यापारी राऊ बैरागी व त्यांच्या कुटुंबाची पुन्हा भेट होऊ शकली, असे प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT