Varan 
अहिल्यानगर

वरणाला महागाईचा तडका, तेलही भडकले

दत्ता इंगळे

नगर तालुका ः महाराष्ट्रीय लोकांना रोजच्या जेवणातील भाजीवर चमचमीत तर्री हवी असते. त्याशिवाय त्यांना जेवण रुचकर लागतच नाही. मात्र, आता भाजीवर तर्री दिसणे अवघड होत आहे. कारण, सध्या खाद्यतेलांचे दर गगनाला भिडले आहेत. विशेषतः शेंगदाणे, सोयाबीन, सूर्यफुल तेलाच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्याने, गोरगरीबांचे महिन्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

आपल्या शेतात सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकरी वर्गाला सोन्याच्या मोलाने खाद्यतेल घ्यावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर खाद्यतेलाच्या किमती अवलंबून असतात. त्यामुळे स्थानिक बाजारात दरावर नियंत्रण ठेवता येत नाही. सध्या विविध ब्रॅंडच्या शेंगदाणा, सूर्यफूल तेलाच्या किमतीत 20 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. जुन्या तांदळाच्या दरातही 45 वरून 55 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. (Oil prices rose sharply during the lockdown)

मसूरडाळीच्या दरात महिनाभरात 10 रुपयांनी वाढ झाली. लॉकडाउनच्या आधी 70 रुपये किलो असलेली मसूरडाळ आज 78 ते 80 रुपये किलो दराने विकली जाते. त्या जोडीला बारीक मीठ, तांदूळ आणि मसूरडाळही महाग झाली आहे. त्यांच्या किमतीतही 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. लॉकडाउनमुळे वाहतूक खर्च, हमाली वाढल्याचे कारण देत घाऊक व्यापाऱ्यांकडून दरवाढ करण्यात येत आहे.

खाद्यतेलाच्या किमती वाढणार असल्याची कुणकुण लागताच बडे विक्रेते व पुरवठादार मोठ्या प्रमाणात साठेबाजी करतात. सरकारही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे ग्राहकांना उच्चांकी दराने खाद्यतेल खरेदी करावे लागते आणि बड्या व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे होते.

परतदेशातून आयात केल्या जाणाऱ्या पाम तेलाचे भाव वाढले आहेत. भारतीय बाजारपेठेत तेलाची आवक घटली आहे. सोयाबीन, शेगदाणा, सुर्यफुल आदी खाद्यतेलाचे भावही वाढले आहेत. रोजच वाढत जाणारा इंधन खर्च, वाहतूक व्यावस्था यागोष्टीही खाद्यतेलाच्या भाववाढीस कारणीभूत ठरल्या.

- भरत अनदाणी, किराणा व्यापारी, नगर

(Oil prices rose sharply during the lockdown)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Clash: मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात, स्वतः एसपी उतरले रस्त्यावर

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

SCROLL FOR NEXT