Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

Tragic Landslide in Himachal Pradesh’s Bilaspur : बसवर मोठ्याप्रमाणात दरड आणि मोठे दगडं कोसळल्याने प्रचंड नुकसान व जीवितहानी झाली आहे.
Rescue teams clearing debris after a massive landslide buried a passenger bus in Bilaspur, Himachal Pradesh, claiming 18 lives.

Rescue teams clearing debris after a massive landslide buried a passenger bus in Bilaspur, Himachal Pradesh, claiming 18 lives.

esakal

Updated on

Bilaspur landslide News : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या एका बसवर मोठी दरड कोसळल्याने, यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

बसवर मोठ्याप्रमाणात दरड आणि मोठे दगडं कोसळल्याने प्रचंड नुकसान व जीवितहानी झाली आहे. ही दुर्घटना सांयकाळच्या सूमारास घडली. घटनेची माहिती मिळाताच मदत आणि बचावकार्य सुरू झालं आहे.

प्राप्त माहितीनुसार, तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक लोकही मदतीसाठी धावले. तर संध्याकाळ नंतर ही दुर्घटना घडल्याने मदत आणि बचावकार्यात अडथळे येत आहेत.

Rescue teams clearing debris after a massive landslide buried a passenger bus in Bilaspur, Himachal Pradesh, claiming 18 lives.
Modi Cabinet Approves New Railway Projects : मोदी सरकारचा मोठा निर्णय! चार नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी; महाराष्ट्राचाही समावेश

हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी बस अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि मदत कार्य जलदगतीने करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, या कठीण काळात राज्य सरकार पीडित कुटुंबांसोबत ठामपणे उभे आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com