खासदार सुजय विखे
खासदार सुजय विखे 
अहमदनगर

जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांना फळपीक विमायोजनेचा लाभ : डॉ. विखे

दौलत झावरे

नगर : प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमायोजनेचा लाभ मिळावा म्हणून दाखल केलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार 546 फळबागउत्पादक शेतकऱ्यांना दोन कोटी 72 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. 

हवामानातील बदलांचा मोठा परिणाम फळबागांवर होतो. होणाऱ्या नुकसानीची भरपाई म्हणून केंद्र सरकारने हवामानावर आधारित पंतप्रधान फळपीक विमायोजनेची सुरवात केली आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील एक हजार 546 शेतकऱ्यांना दोन कोटी 72 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले. उर्वरित प्रस्तावांचाही पाठपुरावा करून विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

तालुकानिहाय लाभार्थी (कंसात मिळालेला लाभ रुपयांत) 

कर्जत - 30 (14 लाख 45 हजार) 
नगर - 74 (10 लाख 11 हजार) 
पारनेर - 27 (2 लाख 71 हजार) 
पाथर्डी - 1 हजार 15 (92 लाख 68 हजार) 
राहुरी - 1 (42 हजार 848) 
शेवगाव - 78 (12 लाख 55 हजार) 
श्रीगोंदे - 38 (4 लाख 51 हजार) 
राहाता - 115 (37 लाख 78 हजार) 
संगमनेर - 69 (6 लाख 14 हजार) 
कोपरगाव - 63 (10 लाख 55हजार) 
नेवासे - 25 (6 लाख 25 हजार) 
श्रीरामपूर - 11 (2 लाख 64 हजार)

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT