शरद पवार
शरद पवार sakal
अहमदनगर

पाथर्डी : ढाकणेंच्या पाठीशी उभे राहा ; शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : सामान्य माणसाशी बांधिलकी असणारा नेता म्हणून बबनराव ढाकणे यांनी राज्यात ओळख निर्माण केली आहे. या कर्तृत्वाचा वारसा टिकवून ठेवायचा असेल, तर प्रताप ढाकणे यांच्या पाठीशी तरुणांनी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. यामुळे प्रताप ढाकणे यांची पाठराखण केल्याने ढाकणे समर्थकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात पवार यांनी ढाकणे यांची पाठराखण केल्याने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रताप ढाकणे यांच्या नावाला पवार यांनी हिरवा कंदील दाखविला असल्याचेही मानले जात आहे. या कार्यक्रमाला ढाकणे यांनी पवार यांना बोलावत, त्यांचे एके काळचे सहकारी बबनराव ढाकणे यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन केले. राष्ट्रवादीतील आपले वजन वाढविले व ते करत असताना या कार्यक्रमाचे नेटके आयोजनही केले.

सलग तीन विधानसभा निवडणुकांत प्रताप ढाकणे यांना पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये एक शल्य निर्माण झाले असून, मागील विधानसभेला अल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागल्याने, पुढे काय, असा प्रश्न ढाकणे व त्यांच्या समर्थकांसमोर उभा ठाकला होता. मात्र, पवार यांनी पाठराखण केल्याने हा प्रश्न आता निकाली निघाला असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. ढाकणे यांच्या पत्नी प्रभावती ढाकणे भालगाव गटातून निवडून आल्या होत्या. ढाकणे यांचे पुत्र ऋषिकेश ढाकणे हेसुद्धा सक्रिय आहेत. आगामी काळात ऋषिकेश यांना बोधेगाव गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रताप ढाकणे उतरवू शकतात. त्याला राष्ट्रवादीतून पाठिंबाही आता मिळू शकत असल्याने, सध्या तरी या कार्यक्रमामुळे व पवार यांनी केलेल्या पाठराखणीमुळे ढाकणे समर्थकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT