Puranpoli meal to patients at Kovid Center
Puranpoli meal to patients at Kovid Center 
अहमदनगर

कोविड सेंटरमधील रूग्णांना कोल्हे परिवाराचे पुरणपोळीचे जेवण

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव ः येथील कोविड सेंटरमधील रुग्णांना गुढीपाडव्यानिमित्त औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते पुरणपोळीचे जेवण देण्यात आले, तसेच ऑक्‍सिजन सिलिंडर व ऑक्‍सिकॉन्स्ट्रेटर व 300 रुग्णांना पुरेल एवढ्या औषधांचा पुरवठा संजीवनी उद्योगसमूहाच्या वतीने करण्यात आला. 

कोल्हे म्हणाले, ""भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सर्वत्र गुढीपाडवा साजरा होत असताना, कोविड सेंटरमधील रुग्ण त्यापासून वंचित राहू नयेत, अशा सूचना दिल्या. त्यानुसार कोविड सेंटरला भेट देत रुग्णांना पुरणपोळीचे जेवण देत त्यांचा आनंद द्विगुणित केला. '' 

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, विजय वाजे, कैलास जाधव उपस्थित होते. 
कोल्हे यांनी कोविड सेंटरमधील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे रुग्ण दगावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी संजीवनी उद्योगसमूहाच्या वतीने तत्काळ ऑक्‍सिजन सिलिंडर व एक ऑक्‍सिकॉन्स्ट्रेटर आणि 300 रुग्णांना पुरेल एवढा औषधांचा पुरवठा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT