Religious events in Nevase were canceled in the wake of the Corona 
अहिल्यानगर

नेवासेत ना टाळ मृदंगाचा... ना ज्ञानोबा-तुकाराम'चा गजर....

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे ज्ञानेश्वर मंदिर व नेवासे शहर बंद असल्याने नेवाशात ना टाळ मृदंगाचा... ना ज्ञानदेव तुकारामचा गजर.... ना मंदिरामध्ये कीर्तनाचा सूर... ना कार्यकर्ते, ना गर्दीने फुललेला परिसर, अशी निरव शांतता सर्वत्र होती.

आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या कामीका एकादशी वारीसाठी नेवासे नगरीत नेवासे, शेवगाव, गंगापूर, श्रीरामपूर तालुक्यातून शेकडो वारकऱ्यांच्या पायी दिंड्या- पालख्या व लाखो भाविक येत असतात. त्यावेळी नेवासेकडे जाणारे तालुक्यातील बहुतांशी रस्ते भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन मुखी ज्ञानदेव- तुकाराम नामघोष करत वारकऱ्यांनी व यात्रोत्सवामुळे गजबजलेला असायचे, पण यंदा कोरोनामुळे रस्त्यांवर नीरव शांतता अनुभवायला मिळाली. कमिका एकादशीनिमित्त गुरुवारी (ता. १६) पहाटे चार वाजता संस्थान प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, शामल व आशिष कावरे, शांताबाई व मच्छिंद्र भावर, संस्थांचे अध्यक्ष ॲड. माधव दरंदले, विश्वस्त रामभाऊ जगताप, डॉ. करणसिंह घुले, जालिंदर गवळी यांच्या हस्ते पैस खांबास दुग्ध अभिषेक व महाआरती करण्यात आली. दरम्यान प्रशासनाने ज्ञानेश्वर मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, नेवासे- श्रीरामपूर रस्ता, गणपती चौक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. तहसीलदार रुपेश सुराणा व पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांनी बुधवारी रात्रीपासूनच मंदिर व शहरात फिरून योजनाबद्ध नियोजन केले होते.

महसूल व पोलिसांकडून भाविकांचे आभार
या यात्रोत्सवासाठी जिल्ह्यातून सुमारे तीन ते चार लाख भाविक येथे जातात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूल व पोलीस प्रशासनाने भाविकांना गर्दी न करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व दिंड्याचालक, वारकरी, भाविक, शहरातील व्यापारी व नागरिक यांचे आभार तहसीलदार रुपेश सुराणा व पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी मानले आहेत.
उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील म्हणाले, "कामिका एकादशी निमित्त 'पैस'च्या दर्शनासाठी विविध तालुक्यातून सुमारे अडीचशे-तीनशे दिंड्या व पालख्याची परंपरा यावर्षी खंडित झाली. यादरम्यान दिंड्यांचे स्वागत व वारकऱ्यांची सेवा करता न आल्याने मनाला वेदना होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकरी कर्जमाफीसाठी बॅंकांची माहिती तयार! ३० जून ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदारांचा समावेश; नियमित कर्जदारांना मिळणार ‘हा’ लाभ

Yogi Adityanath : औरंगजेबाची मोठी घोडचूक काय होती? वीर बाल दिवसानिमित्त योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल!

आजचे राशिभविष्य - 28 डिसेंबर 2025

Panchang 28 December 2025: आजच्या दिवशी मंजिष्ठ, केशर किंवा रक्तचंदन पाण्यात टाकून स्नान करावे

Winter Special Recipe: हिवाळ्याची खास चव! शेंगाचा सिझन संपायच्या आधी सोल्याचे कढिगोळे नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT