Revenue Minister Balasaheb Thorat has expressed confidence that the government has tried to deal with the difficult situation 
अहिल्यानगर

सोनिया गांधी शिवसेनेसोबत आघाडी करण्यास तयार नव्हत्या, पण...; बाळासाहेब थोरातांचा मोठा खुलासा

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : महाविकास आघाडी सरकार निर्माण करणे एक वेगळा प्रयोग होता. त्यासाठी काॅंग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी तयार नव्हत्या. शेवटी विचारसरणीचा प्रश्न होता. परंतु भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी सहमती दर्शविली. सरकार आल्यानंतर आॅक्टोबर पर्यंत कोरोना संकट सुरु होते. धारावीमधील कोरोना संसर्ग रोखणे सोपे नव्हते. त्यानंतर अनेक संकटे आली.

अर्थव्यवस्था महत्वाचे काम करत होती. सरकारची वाटलाच अडचणीतून झाली. विकासाचे काम म्हणून पैसा कमी पडतो. त्यात केंद्राकडून वेळेवर जीएसटी न मिळाल्याने ३० हजार कोटी थकले. आता पुन्हा कोरोना वाढल्याने गरीब माणूस अडचणीत येतो. परंतु कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचा विश्वास महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

पत्रकारांशी बोलतांना थोरात म्हणाले, सध्या अनेक शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णालयाची स्थिती पुर्वीसारखी होत आहे. परंतू कोरोनाचे संकटाशी सरकारने अंत्यत यशस्वीपणे सामना केला. पुन्हा लाॅकडाऊन असा सवाल केला जातो. परंतु प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून प्रशासन योग्य तो निर्णय घेत आहे. तसेच लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. परंतु पाहिजे तेवढी लस तयार होत नसल्याने लसीकरण वाढविणे, रुग्णांवर उपचार करण्यावर सरकार लक्ष देत आहे.

कोरानासाठी केंद्राने सप्टेंबर महिन्यापर्यंत मदत केली. त्यानंतर पथके पाठवून काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. सरकारकडून झालेली चुका दाखवा. पंरतु आपणही काळजी घेणे गरजेचे आहे. एका गावाची निवड करुन नवीन वीज योजना राबविली जाणार आहे. त्यातून त्याचे महत्व कळणार असल्याचे महसुलमंत्री थोरात यांनी सांगितले.

दरम्यान ते म्हणाले, हिरण यांची हत्या झाल्याची घटना अतिशय दुर्देवी आहे. त्याकडे पोलीसांनी विशेष लक्ष घातले असून पुढील तपास योग्य प्रकारे करावा. आरोपींवर कठोर करवाई होवून हिरण कुटूंबियाना न्याय मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांना कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रत्येक भाषणाचा शेवट सरकार विरोधी बोलून करावा लागतो. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणे हे विरोधकाची जबाबदारी आहे. मात्र पुर्वीच्या सरकारपेक्षा राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगले काम सुरु आहे. विरोधकांना सरकारची काळजी करण्याचे कारण नसून आमचे काम मस्त सुरु असल्याचा विश्वास महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT