rohit pawar and raosaheb danve
rohit pawar and raosaheb danve 
अहमदनगर

दानवेंनी वडापावचे पैसे दिले नाहीत? रोहित पवारांचा मिसळ खाताना टोला

सकाळ डिजिटल टीम

मागील आठवड्यापासून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या वडापाव आणि चहाची पोस्ट चांगलीच गाजली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत रेल्वेतून प्रवासादरम्यान दानवे यांनी वडापाव खाल्ल्याचं ट्वीट केलं. पण या ट्विटची चर्चा दानवेंनी पैसे न दिल्याने झाली. काहींनी त्यांच्यावर वडापाव खाऊन पैसे न दिल्याचा आरोप केला.

त्यानंतर सोशल मीडियावर रावसाहेब पुन्हा चर्चेत आले. अनेकांनी मिश्किल टिप्पण्या करत दानवेंना टोला लगावला. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही दानवेंना टोला लगावल्याचं दिसतंय. रोहित पवारांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले. त्यांनी दानवेंसोबत फडणवीसांनाही टोला लगावला.

रोहित पवार यांनी नगरच्या जामखेडमध्ये असताना कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाण्याचा आस्वाद घेतला. यावेळी काही फोटो काढून त्यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केले आणि पुन्हा चर्चांना उधाण आलं.

काय म्हणाले रोहित पवार?

'मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली... एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने '३५' मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं.. आणि हो... मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं.

हे ट्वीट केल्यानंतर फडणवीसांच्या ३५ पुरणपोळ्या आणि दानवे यांनी वडापाव खाऊन न दिलेले पैसे, असे दोव्ही मुद्दे अधोरेखित झाले. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये आवडीने हा विषय चघळला जातोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

IPL 2024 MI vs LSG : शेवट गोड करण्याचे लक्ष्य; मुंबई - लखनौमध्ये आज लढत; रोहितला फॉर्म गवसणार?

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

SCROLL FOR NEXT