Sadhguru Gangagir Maharaj's Harinam Week this year
Sadhguru Gangagir Maharaj's Harinam Week this year 
अहमदनगर

सद्‌गुरू गंगागीर महाराजांचा यंदा व्हर्च्युअल हरिनाम सप्ताह 

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः एकशे बहात्तर वर्षांची परंपरा असलेला आणि लाख- दीड लाख भाविकांच्या उपस्थितीत पार पडणारा सद्‌गुरू गंगागीर महाराज यांचा हरिनाम सप्ताह यंदा प्रथमच व्हर्च्युअल पद्धतीने साजरा होणार आहे. सराला बेट येथे येत्या 24 ते 31 जुलै या कालावधीत, अवघ्या चाळीस टाळकऱ्यांच्या उपस्थितीत हा सप्ताह साजरा केला जाईल. या काळात काल्याच्या कीर्तनासह महंत रामगिरी महाराज रोज एक तास प्रवचन देतील. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण करण्यात येईल. भाविकांनी घरात बसून सप्ताहात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

कोरोनाच्या साथीमुळे व्हर्च्युअल पद्धतीने हा हरिनाम सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महंत रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत काल या सप्ताहाच्या नियोजनाची प्राथमिक बैठक झाली. या वेळी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, कडूभाऊ काळे, बाळासाहेब कापसे, कमलाकर कोते, बाबासाहेब चिडे, मधुकर महाराज, किशोर थोरात व संदीप पारख, तसेच श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. येत्या गुरुवारी (ता. 16) पुणतांबे येथे महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते या सर्वांकडे या व्हर्च्युअल सप्ताहाचा नारळ परंपरेप्रमाणे सुपूर्द केला जाईल. 

एरवी या सप्ताहास प्रारंभ झाल्यानंतर अखंड हरिभजनासाठी चार प्रहरांत विभागातून प्रत्येकी दोन हजार, असे आठ हजार टाळकरी रोज सेवा रुजू करतात. यंदा केवळ चाळीस टाळकरी चार प्रहरांत विभागून ही सेवा रुजू करणार आहेत. या सप्ताहाच्या काळात नगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील पन्नास ते साठ हजार भाविक रोज आमटी- भाकरीचा प्रसाद घेतात. दहा-वीस टॅंकरच्या साहाय्याने आमटी वितरित करावी लागते. काल्याच्या कीर्तनाला लाख- दीड भाविकांचा मेळा जमतो. दोन ते अडीच कोटी रुपये वर्गणी जमते. यंदाच्या सप्ताहात एकाही भाविकाला सहभाग घेता येणार नाही. एवढेच नव्हे, तर या काळात सराला बेटावरील रस्ते बंद केले जाणार आहेत. अहमदनगर 

सर्व सहकार्य करणार ः थोरात Sadhguru Gangagir Maharaj's Harinam Week this year
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सराला बेट येथे व्हर्च्युअल पद्धतीने व भाविकांविना हा सप्ताह साजरा करण्याची बैठक झाली. त्यानंतर लगेचच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून माहिती घेतली. आवश्‍यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.  


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराट आऊट, पण फाफ डू प्लेसिसचा चेन्नईला अर्धशतकी दणका

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT