संदेश विटनोर
संदेश विटनोर 
अहमदनगर

अंघोळीसाठी गेलेल्या होमगार्डचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू

शांताराम काळे

अकोले (नगर) : राहुरी तालुक्यातील मांजरी गावातील होमगार्ड संदेश विटनोर हा युवक अकोले तालुक्यात आपले कर्तव्य बजावत होता. त्याची मुक्कामासाठी  अकोले तालुक्यातील अगस्ती मंदिर प्रसाशनाने सोय केलेली होती. माञ सकाळी अंघोळीसाठी बाहेर पडलेल्या संदेशचा प्रवरा नदीच्या पाञात बुडून मृत्यू  झाला आहे. 

अकोले तालुक्यात आणि परिसरात ही बातमी समजताच हळहळ व्यक्त करण्यात आली. एकीकडे अकोले तालुक्यात आणि महाराष्ट्रात आपले कर्तव्य बजावत तुटपुंज्या मानधनामध्ये कोरोना कालावधीत काम करत होता. त्यात ही घटना घडल्यामुळे अकोलेकरांनी हळहळ व्यक्त केली आहे. कोरोना कालावधीमध्ये त्याने आपला जीव जोखमीत टाकून इतरांची सुरक्षा केली. 

अशा परिस्थितीत या युवकाचा जीव गेल्यावर अकोले तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आशा सेविका, अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलिस, वैद्यकिय कर्मचारी यांना सुरक्षा देणे काळाची गरज आहे. माञ ही सर्व गोष्ट घडली असताना एकीकडे कोरोना योध्दा म्हणून कर्मचाऱ्यांना गौरवीत असताना नुसते पुरस्कार, सन्मान नको तर सुरक्षेची गरज असल्याचे निदर्शनास येत आहे. 

संपादन : सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT