Sant Nilobarai Yatrautsav postponed
Sant Nilobarai Yatrautsav postponed 
अहमदनगर

संत निळोबाराय यात्रौत्सव स्थगित, अकरा दिंड्यांनाच प्रवेश

एकनाथ भालेकर

राळेगण सिद्धी : ""राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संत निळोबाराय यांचा यात्रोत्सव स्थगित करण्यात आला आहे. 15 मार्चला मानाच्या 11 दिंड्याना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. 16 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सपत्नीक समाधीची पूजा होईल.

दुपारी 12 वाजता पांडुरंग महाराज घुले यांच्या काल्याच्या कीर्तनाने यात्रोत्सवाचा समारोप होईल,'' अशी माहिती संत निळोबाराय देवस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी दिली. 

संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रांताधिकारी सुधाकर भोसल, तहसीलदार ज्योती देवरे, सरपंच सुभाष गाजरे यांच्यासह देवस्थानच्‌ पदाधिकारी व ग्रामस्थांच्या 
उपस्थितीत पिंपळनेर येथे बैठक पार पडली. 

""यात्रोत्सव स्थगित झाला असला, तरी मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत शासनाचे सर्व निर्देश पाळून निळोबाराय गाथा पारायण, हरिपाठ, काकडा आरती व कीर्तने होतील. 14 मार्च रोजी संत तुकाराम महाराज संस्थांनच्या वतीने निळोबारायांच्या समाधीची महापूजा होईल. राज्यातील प्रमुख 11 दिंड्यांना संत निळोबाराय सोहळ्यात सहभागी होता येईल,'' असे सावंत यांनी सांगितले. अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT